IMD नं लॉन्च केलं Mausam App, मिळेल 450 शहरांच्या हवामानाचा ‘रियल-टाइम’ अचूक इशारा आणि माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना लॉकडाऊनमध्ये हवामान विज्ञान विभागाने (आयएमडी) आपले मोबाईल अ‍ॅप आणले आहे. या अ‍ॅपचे नाव ’मौसम’ ठेवले आहे. अ‍ॅपद्वारे लोकांना देशभरातील 450 शहरांतील हवामानाचे रियल-टाइम अपडेट आणि इशारा मिळेल. हे अ‍ॅप हवामानची माहिती देणारे पहिले सरकारी अ‍ॅप असेल. यापूर्वी आलेले हवामान अधारित अ‍ॅप जुने आकडे आणि पावसाच्या ऑब्जर्वेशनची माहिती देत होते.

हे अ‍ॅप शहरातील लोकसंख्येला समोर ठेवून तयार करण्यात आले आहे. अ‍ॅप हवामानाचा अंदाज वर्तवण्यासह रडार आणि उपग्रहाकडून मिळालेली छायाचित्रे दाखवेल, जी अगोदर केवळ आयएमडीच्या वेबसाइटवर दिसत असत.

लवकरच अन्य भाषेत सुद्धा अ‍ॅप येणार
ईटीच्या वृत्तानुसार अ‍ॅप पुढील वर्षी हायपरलोकल मॅप्स आणि स्थानिक भाषांच्या पर्यायांसह आपला विस्तार करणार आहे. पुढील वर्षापर्यंत, शेतकर्‍यांसाठी सुविधा वाढवण्यात येतील. ते जीपीएसच्या आधारावर प्रत्येक तीन तासात अपडेट प्राप्त करतील, आणि आपल्या पसंतीच्या भाषेत अंदाज जाणून घेऊ शकतील.

स्वदेशी अ‍ॅपवर मागील वर्षापासून सुरू होते काम
या स्वदेशी अ‍ॅपवर मागील एक वर्षापासून काम सुरू होते. परंतु, कोरोना लॉकडाऊनमुळे यास उशीर झाला. आयएमडीने सरकारच्या उमंग अ‍ॅपसाठी आपली सेवा दिली, ज्यामध्ये राज्य आणि केंद्र सेवा आणि बिल भरणा याचा समावेश आहे. मात्र, उमंगकडे तात्काळ अपडेटचा अभाव होता, जो ’मौसम’ आता पूर्ण करेल.

पावसाच्या अंदाज मिळेल
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या 14व्या स्थापना दिवसावर बोलताना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी जलवायु अंदाजासाठी पृथ्वी प्रणाली मॉडलचा उपयोग करत मागील दोन वर्षात सरकारने रेन गेजिंग आणि क्लाऊड सीडिंगवर संशोधन करण्याबाबत म्हटले. या प्रयोगातून आयएमडीला मान्सूनच्या हवामानाचे चांगले आकलन करण्यास मदत मिळेल आणि दुष्काळी भागात पाऊस पाडता येईल.