पाकिस्तान ‘कंगाल’ होण्याच्या मार्गावर, IMF ने दिला ‘इशारा’ !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तान सध्या चांगलाच कचाट्यात सापडला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे. पाकिस्तानने यावर लवकरात लवकर कठोर पाऊले न उचलल्यास पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. आयएमएफने पाकिस्तानला चेतातवनी दिली आहे की पाकिस्तानने अर्थव्यवस्था सुधारणेसाठी लवकर काही निर्णय घेतले नाही तर पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमधील खराब अर्थव्यवस्थेचा भार हा सामान्य लोकांवर आला आहे. पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदी इम्रान खान विराजमान झाल्यापासून पाकिस्तानच्या रुपयाचा दर ३० टक्क्यंनी घसरला आहे. मागील वर्षात २०१८ मध्ये पाकिस्तानी रुपयाचा दर १२३.३५ होता. तो आता २६ मे २०१९ मध्ये १६० च्या वर गेला आहे. पाकिस्तानच्या इतिहासात ऐवढ्या कमी कालावधीत पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण झाली आहे.

आयएमएफ सध्या पाकिस्तानला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ६ अब्ज डॉलर म्हणजे ४१ हजार कोरड रुपयांचे पॅकेज देण्यासाठी तयार झाला आहे. आयएमएफच्या कार्यकारी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष डेविड लिप्टन यांच्या मते आर्थिक आणि कमकुवत, असंतुलित विकासामुळे पाकिस्तानला आर्थिक आघाडीवर आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. आर्थिक असंतुलन सुधारण्यासाठी करात वाढ केली पाहिजे. चलन साठा वाढविण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी, चलनविषयक कठोर धोरण आखले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. तसंच पाकिस्तानने अर्थव्यवस्था सुधारणेसाठी लवकर काही निर्णय घेतले नाही तर पाकिस्तानची आर्थिक स्थिती अधिक खराब होण्याची शक्यता आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात