बळीराजासाठी महत्त्वाची बातमी : ‘या’ क्रमांकावर मॅसेज कराअन् मिळवा शेतीच्या योजनेची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने राज्यातील कृषी विभागाच्या विविध माहिती व त्याचा लाभ पोहोचविण्यासाठी (now-use-whatsapp-for-information-on-agricultural-schemes) प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाॅट्सअ‍ॅपचा वापर करण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे (agriculture minister Dadaji Bhuse ) यांनी दिली.

राज्यात सुमारे 9 कोटी 37 लाख मोबाईलधारक असून, कृषी विस्तार कार्यामध्ये या बाबीचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन या व्हाॅट्सअ‍ॅपद्वारे कृषीविषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची सुविधा केली आहे. मोबाईलवरून 8010550870 या व्हाॅट्सअ‍ॅप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’ शब्द टाईप करून पाठविणाऱ्या व्यक्तीस स्वागत संदेश प्राप्त होतो.

ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस् ) दिले आहेत. ते टाईप करून या व्हाॅट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते. सध्या या उपक्रमात कृषी विभागाच्या जवळपास 27 योजनांचा समावेश केला असून त्यात कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही समावेश करून त्यांची तपशीलवार माहिती दिली आहे. विभागामार्फत योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉग तयार केला असून, त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, निकष अनुदान व अर्ज कुठे करावा, याबाबत माहिती देण्यात आली आहे.