धक्कादायक ! फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर वृध्द दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचं आलं समोर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद जिल्ह्यातील बन्सीलालनगर मध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तर येथील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने असल्याचे समजल्यावर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन तेथे शोध घेतला असता चक्क त्या घरात वृद्ध दांपत्याचे कुजलेले मृतदेह दिसले. या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजय माधव मेहंदळे (वय, ७०), माधुरी विजय मेहंदळे (वय, ६५) असे त्या मृत दांपत्याचे नावे आहेत. ही घटना मंगळवारी (दि.२३) मार्चला घडली आहे.

फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने, एका पोलिस कर्मचाऱ्याने छतावर जाऊन किचनच्या गॅलरीत उतरून आत बघितले असता त्यांचा मृतदेह दिसला. पोलिसांनी आत जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बन्सीलालनगर येथील अजिंक्य फिलोसिया अपार्टमेंट फ्लॅट क्र. ४०३ मध्ये हे दांपत्य राहात होते. विजय मेहंदळे हे वाल्मीमध्ये नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते शहरातच स्थायिक झाले. तर, त्यांच्या एकुलत्या एक मुलगीचा विवाह झाल्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. मेहंदळे यांचे काही नातेवाईक शहरातच असून त्यांचे अधिक येणे जाणे नाही. तसेच घडलेली हकीकत अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलीला दिली असता तिकडून येणे आता शक्य नाही, अंत्यविधी तुम्हीच उरकून घ्या, असे त्या मुलीने म्हटले आहे. नंतर, शेवटी पोलिसांनीच माणुसकी दाखवत वृद्ध दांपत्याचे अंत्यसंस्कार केले आहे.

विजय मेहंदळे यांना सोरायसीस आणि माधुरी मेहंदळे यांना पॅरालिसीस हा आजार होता. हे आजारी वृद्ध दांपत्य शक्यतो घरातच राहायचे. ते अधिक बाहेर जात नसल्याने, आणि घराचा दरवाजाही नेहमी बंद असल्याने शेजाऱ्यांशी त्यांचा फारसा संपर्क व्हायचा नाही. तसेच गेले १० ते १२ दिवसांपासून बाहेरच आले नव्हते. आणि त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. ही माहिती सोमवारी दुपारी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद विठ्ठलराव देवतवाल यांनी वेदांतनगर पोलिसांना दिली. पीआय रामेश्वर रोडगे, सहायक निरीक्षक अनिल कंकाळ आणि उपनिरीक्षक प्रमोद देवकाते हे घटनास्थळी गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.