गुगवाडमध्ये मटक्याच्या आड्ड्यावर छापा  

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

गुगवाड (ता. जत) येथे मटका अड्ड्यावर छापा टाकून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मोबाईल, रोकड असा 16 हजार 220 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.२३) दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली.

चांद रसूल खुजानवाडी (वय 42), रहिमान गुलाब वाडकर (वय 30, दोघेही रा. गुगवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. जत तालुक्यातील गुगवाड येथे मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.

पथकाने शनिवारी दुपारी गुगवाड येथे वाडकर यांच्या घराशेजारी असणार्‍या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. तेथे दोन्ही संशयितांना मटका घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन मोबाईल, मटक्याचे साहित्य, रोख 5 हजार 210 रूपये असा 16 हजार 220 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र जाधव, युवराज पाटील, अरूण सोकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.