धक्कादायक…हिंजवडीत ‘इंजिनियर’च्या ‘ड्रॉवर’ मध्ये आढळले पिस्तूल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

‘मेकॅनिक इंजिनियर’ असलेल्या एका सराईत गुन्हेगाराकडून सात पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केल्याची घटना ताजी असताना हिंजवडीत धक्कादायक घटना समोर आली आहे. आयटी पार्कमधील ऍपलटन बिझनेस ग्रुपच्या कार्यालयातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये हिंजवडी पोलिसांना एक गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले आहे.

[amazon_link asins=’B00KNN4N4I,B075DJ7ZYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00226096-ac1a-11e8-9e94-09521914fc4f’]

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आयटी पार्कमधील ऍपलटन बिझनेस ग्रुपच्या कार्यालयात एकाकडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन पाहणी केली. त्यावेळी या कार्यालयात लीड इंजिनियर म्हणून काम करणाऱ्याच्या टेबलच्या ‘ड्रॉवर’मध्ये एक गावठी बनावटीचे १५ हजार रुपये किंमतीचे पिस्तुल आढळून आले आहे. हिंजवडी पोलिसांनी ते जप्त केले आहे.

या कंपनीच्या कार्यालयात कोणी पिस्तुल आणले, ड्रॉवर मध्ये कोणी ठेवले याचा शोध पोलीस घेत आहेत. इंजिनियरच्या टेबलच्या ड्रॉवरमध्येच का ठेवले असावे या सर्व बाबींचा शोध सुरु आहे. ही कामगिरी उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, तपासी पथकाचे सहायक निरीक्षक धामणे आणि त्यांच्या पथकाने केली.

जाहिरात