अखेर लढाई जिंकली ; सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीन चिट

लैंगिक छळ केल्याचे होते आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याच्या करणावरून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपातून क्लीन चिट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या त्रिसदस्यी समितीने या प्रकरणी निर्णय दिला आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

एका ३५ वर्षीय महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ही महिला सर्वोच्च न्यायालयाची माजी कर्मचारी आहे. डिसेंबर २०१८ मध्ये तिला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले होते. या आरोपानंतर एकाच खळबळ उडाली होती. या महिलेच्या आरोपनंतर सर्वोच्च न्यायालयात तातडिने सुनावणी घेण्यात आली. याकरिता जस्टिस एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

दरम्यान सरन्यायाधीशांनी मात्र आपल्यावरील आरोपांचा ठाम शब्दांत इन्कार केला होता. या प्रकरणी सरन्यायाधीशांच्या विरोधात मोठे कट कारस्थान रचण्यात येत असल्याचे सांगत वकील उत्सव बेन्स यांनी या प्रकरणाचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला सादर केले होते.