लासलगावात मध्ये मेडिकल दुकानदाराकडे बिल मागितल्याचा राग आल्याने केली अमानुष मारहाण

लासलगाव – निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथील मोरे कुटुंबाचा कोवीड पॉझिटिव्ह निघाल्याने लासलगाव येथील कातकडे हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते मात्र संजीवनी मेडीकल येथुन घेतलेल्या औषधांचे मेडीकल बिलामध्ये तफावत आढल्याने मेडिकलचे संचालक गणेश फड आणि मोरे यांच्या मध्ये बाचाबाची होत हाणामारी झाली गणेश फड व त्याचे मेडीकल मधील मुलाने मारहाण केली यामध्ये महिलेलाही धक्काबुक्की झाली असून या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच गणेश फड यांच्या पत्नीनेही क्रॉस कंप्लेट केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कसबे सुकेने येथील मोरे यांचे कुटुंब हे पॉझिटिव्ह निघाल्याने लासलगाव येथील कातकडे हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते. दरम्यान कातकाडे हॉस्पिटल समोरील संजीवनी मेडिकल मधून घेतलेल्या औषध गोळ्यांचे बिल मागितले असता मेडिकल संचालक गणेश फड याला राग आला बिलामध्ये एक हजार रुपयाचा फरक असल्याने रुग्णांचे नातेवाईक व गणेश फड यांचे वादावादी झाल्याने गणेश फड यांच्या मेडिकल मधील कामगार इतर तीन जणांनी अशा पाच जणांनी मिळून रुग्णांवर मारहाण केली एका महिलेला धक्का बुक्की केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे याबाबत देवीदास मोरे यांनी दिलेल्या फीर्यादी वरुन मेडिकल संचालक गणेश फड व इतर जणांविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तसेच गणेश फड यांच्या पत्नीनेही याबाबत क्रॉस कंप्लेट केली आहे.