नव्या सभागृहाच्या गळतीच्या निषेधार्थ सर्व साधारण सभेत विरोधकांचा छत्र्या आणून निषेध 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या उदघाटना दिवशी छतामधून पावसाचे पाणी आल्याने आज सर्व साधारण सभेवेळी राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात छत्र्या आणून निषेध व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन मागील आठवड्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाच्या दरम्यानच नवीन इमारतीच्या छतावरून पाणी गळती झाल्याने या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट झाले या इमारतीचे उद्घाटन पूर्वीपासूनच विरोधकांनी या इमारतीचे काम अर्धवट असल्याचे वेळोवेळी सांगितले. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यावरच याचे उद्घाटन करावे. अशी मागणी अनेक वेळा विरोधकांनी केली होती.
[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b365c252-7a9b-11e8-bd66-1d238f052f39′]
या उद्घाटनाच्या दुसर्‍या दिवशीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निकृष्ट दर्जाच्या कामाच्या निषेधार्थ त्यांनी पुणे महापालिकेत छत्री आणि रेनकोट घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या कामास जबाबदार असणाऱ्या आधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती.

यानंतर आज पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण देखील नव्या इमारतीच्याया निकृष्ट दर्जाच्या कामाचे पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षा विरोधात आंदोलन केले. या गळती प्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली.