Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 5 जणांचा मृत्यू तर 102 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 199 बळी, जाणून घ्या 5 जिल्ह्यातील आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत जात आहे. पुण्यात सोमवारी कोरोनाचे 102 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 49 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाबाधितांपैकी 148 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यामध्ये 50 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील एकुण पॉझिटिव्ह रूग्ण हे 3598 आहेत. त्यापैकी 1599 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 199 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर बर्‍या होणार्‍यांची संख्या ही 1800 वर जाऊन पोहचली असून ती चांगली गोष्ट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत.

पुणे विभागात ‘कोरोना’चे 4744 रूग्ण तर आतापर्यंत 2285 उपचारानंतर झाले बरे

पुणे विभागातील 2 हजार 275 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 744 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 233 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 177 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 123 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 14 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 903 आहे. कोरोनाबाधित एकूण 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 166 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 122, सोलापूर जिल्ह्यात 12, कोल्हापूर जिल्ह्यात 8, सातारा जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 138 कोरोना बाधीत रुग्ण असून 69 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 67 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 390 कोरोना बाधीत रुग्ण असून 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 214 आहे. कोरोना बाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 50 कोरोना बाधीत रुग्ण असून 32 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 43 कोरोना बाधीत रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 32 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 52 हजार 462 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 44 हजार 983 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 7 हजार 539 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 40 हजार 180 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4 हजार 744 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 14 लाख 65 हजार 859 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 92 लाख 30 हजार 712 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 80 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण
पुणे विभागामध्ये 10 मे 2020 पासून ते 18 मे 2020 पर्यंत परदेशातून एकूण 476 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.