मुंबईच्या धर्तीवर पुण्यात नागरिकांसाठी ‘आचारसंहिता’ लागू करण्याचा कोणताही विचार नाही : पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आचारसंहिता लागू करत दोन पेक्षा जास्त व्यक्तींना फिरण्यास बंदी केली; तर रस्त्यावर फिरता देखील येणार नसल्याचे सांगितले जात असून, पुण्यातही संचारबंदी करण्यात येणार असल्याचे म्हंटले जात होते. पण यावर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी अद्याप असा काही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई व पुण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही केल्या संसर्ग आटोक्यात येत नसून, प्रशासन काटेकोर अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे मुंबईत 17 ते 30 सप्टेंबर पोलिसांनी कंटेमेंट झोनमध्ये एक किंवा एका पेक्षा अधिक व्यक्तींना घर बाहेर पडण्यास मनाई केली आहे. म्हणजे हा एकप्रकारे कर्फ्यु असल्याचे म्हटले जाते. यात अत्यावश्यक सेवांसोबतच सर्व काही सुरू राहणार आहे. पण एका पेक्षा जास्त व्यक्तीला फिरता किंवा उभारता येणार नाही. तसेच मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनच असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान मुंबई सारखीच पुण्यात देखील कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे पुण्यात देखील पोलीस व पालिका असे आदेश काढणार असल्याचे म्हटले जात. पण याबाबत पोलीस आयुक्तांनी नकार दिला आहे. त्यांनी याबाबत सांगितले की, असा कोणताच विचार सध्या तरी नाही. पण नागरिकांनी मास्कचा वापर करावा. विनाकारण गर्दी करू नये. नियम पळावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.