गंभीर गुन्ह्यात फरार असणारे सराईत अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

दरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असणाऱ्या सराईत तीन गुन्हेगारांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. आफताब समीर शेख (१९), शाकीब जिलानी शेख (१९), आणि अल्ताफ अस्लम रंगरेज (१९, तिघेही रा. गांधीनगर देहुरोड ता. हवेली, जि. पुणे) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन पवार, सहायक उपनिरीक्षक सावंत, उगले, जगदाळे, जाधव या पथकाला गुन्हेगारांची माहिती मिळाली. त्यानुसार निगडी अोटास्कीम येथुन आफताब समीर शेख, शाकीब जिलानी शेख आणि अल्ताफ अस्लम रंगरेज या तिघांना अटक केली.

[amazon_link asins=’B00ZF89GJ8,B07F1D267G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5c8c4d5c-b1ac-11e8-b848-b9b4e46c48e9′]

समीर शेख याच्यावर भा.द.वि.स. कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२४, भा.द.वि.स. कलम ३५३, ३३२, ३३३, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२४, भा.द.वि.स. कलम ३८४, ३४१, ५०४, ३४, भा.द.वि.स. कलम ३९५, ३९७, १४३, १४७, १४८, १४९, ४५२ असे चार गुन्हे दाखल आहेत.

जाहीरात 

शाकीब जिलानी शेख याच्यावर भा.द.वि.स. कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२४, भा.द.वि.स. कलम ३५३, ३३२, ३३३, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२४, भा.द.वि.स. कलम ३९५, ३९७, १४३, १४७, १४८, १४९, ४५२ असे तीन गुन्हे तर अल्ताफ अस्लम रंगरेज याच्यावर भा.द.वि.स. कलम ३३६, १४३, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट ४ (२७), भा.द.वि.स. कलम ३५३, ३३२, ३३३, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२४, भा.द.वि.स. कलम ३९५, ३९७, १४३, १४७, १४८, १४९, ४५२ असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपास देहूरोड पोलीस करत आहेत.