‘त्या’ प्रकरणी तहसिलदार रूपा चित्रक तडकाफडकी निलंबीत

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – पाटोदा येथील वादग्रस्त तहसीलदार अनेक प्रकरणात अडकल्या आहेत. अधिकार नसताना वाळू उपशाचा परवाना देणे, जुन्या तारखांमध्ये संचिकांवर स्वाक्षऱ्या करणे, कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणे इत्यादी मुद्दे पाटोद्याचे तहसीलदार रूपा चित्रक यांच्या अंगलट आले आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी २५ जुलै रोजी तहसीलदार रूपा चित्रे यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या आधी देखील भोकरदन येथे कार्यरत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पाटोद्याचे विभागीय अधिकाऱ्यांनी ६ फेब्रुवारीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती पण त्या नोटीसकडे चित्रक यांनी दुर्लक्ष केले.

पदाचा गैरवापर करून तलाठ्यांच्या बदल्या करणे, शासकीय वाहनावर खासगी चालक ठेवणे, अधिकार नसताना वाळू उपश्याचा परवाना देणे असे प्रताप तहसीलदार रूपा चित्रक यांनी केले आहेत. यामुळेच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी १२ जून रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे पाठवला होता. यामध्ये तहसीलदार रूपा चित्रक यांनी स्पष्टीकरण देण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने गुरुवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like