निवडणुकांमध्ये महिलांना जास्तीत जास्त जागा मिळाव्यात : फौजिया खान 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आगामी निवडणुकांमध्ये  लोकसभा व विधानसभेसाठी महिलांना जास्तीतजास्त जागा मिळाव्यात अशी मागणी शरद पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान  करणार आहेत. पत्रकारांशी  संवाद साधताना त्यांनी महिला आरक्षण , महाआघाडी व धर्मनिरपेक्षता यांविषयी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी पक्षाने “संविधान बचाव” या कार्यक्रमाची  मुख्य भूमिका महिलांकडे दिलेली आहे . आमदार व खासदार निवडणुकीमध्ये महिलांना महिला जास्तीतजास्त जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार का यावर बोलताना त्या म्हणाल्या की , “लोकसभेत आणि विधानसभेत  ३३ % जागांवर आरक्षण मिळावे ही  आमची आधीपासूनची  मागणी आहे ; त्यासाठी आम्ही लढाई चालूच राहील. त्याबद्दल आम्ही आमच्या पक्षाकडेही पाठपुरवठा करू. आगामी निवडणुकीमध्ये महिलांना जास्तीत जास्त जागा मिळाव्यात अशी मागणी पक्षप्रमुख शरद पवारांकडे करण्यात येईल.”
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c3052a3-c0ba-11e8-bcee-2573cc4a0139′]
काँग्रेस व  राष्ट्रवादी काँग्रेस  युती तसेच महाआघाडीच्या पार्श्वभूमीवर  त्या म्हणाल्या की , संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता तत्व अपेक्षित आहे . ज्या पक्षांमध्ये  धर्मनिरपेक्षता आहे त्या  पक्षांनी महाआघाडीमध्ये आलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे . धर्मनिरपेक्षता नावाखाली आपण वेगवेगळ्या धर्माच्या गोष्टी करू शकत नाही ; कारण एखाद्या धर्माच्या नावाखाली पक्ष काढणे चुकीचे आहे.

सुप्रीम कोर्ट गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनालोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यापासून रोखू शकत नाही. मात्र, त्यांना रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा, असा कोर्टाने निर्णय दिला आहे . या निर्णयावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय स्वीकाहार्य आहे . त्या निर्णयाला अनुसरून  सरकारने एक आदर्श नियमावली तयार केली पाहिजे कारण राजकीय गुन्हेगारी हा मोठा प्रश्न आहे तो थांबला  पाहिजे . स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनी राजकारणात येणं  गरजेचे आहे . नवीन नियमावलीमुळे राजकीय गुन्हेगारीवर  अंकुश ठेवणं शक्य होईल असंही  त्या म्हणाल्या.