पुण्यात ‘ससून’च्या परिसरात रुग्णाची हेळसांड, महिला डॉक्टरने FB व्दारे समोर आणली घटना, जबाबदार कोण ?

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टंन्स ठेवले जात आहे. मात्र, यातून माणूसकी देखील हरवली आहे का? असेही वाटत आहे. कारण, पुणे शहरात शासकीय ससून रूग्णालयाबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. एक वयस्कर रुग्णाला चक्कर आल्याने शासकीय ससून रूग्णालयाबाहेर धडपडत होता. तो रुग्णालयात भर्ती होण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, ससून रुग्णालयाच्या परिसरात बराच वेळ तो रुग्ण पडून होता. कोणीही त्याला रुग्णालयात घेऊन गेले नाही. हा प्रकार पुण्यातील डॉक्टर मानसी पवार यांनी उघडकीस आणाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी, ससून हॉस्पिटलमध्ये कामासाठी आलेल्या डॉ. मानसी पवार यांचे या रुग्णाच्या धडपडीकडे लक्ष गेले आणि त्यांनी तेथील कर्मचार्‍यांना त्या रुग्णाला मदत करून रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. पण, या कर्मचार्‍यांनी हे आमचं काम नाही म्हणत थेट नकार दिला. डॉ. मानसी पवार यांनी हा प्रकार त्यांच्या फेसबुकद्वारे सर्वांसमोर आणला आणि याला कोण जबाबदार? असा सवाल विचारला.

ससून हॉस्पिटलबाहेर नेमकं काय घडलं?
’एक रुग्ण रुग्णालयात जाण्यासाठी धडपड करत असताना दिसला. तो आजारी असल्याने चालूही शकत नव्हता. रुग्णालय परिसरातील सुरक्षा कर्मचार्‍यांना विचारला असता त्यांना तो रुग्ण बाहेर थांबला आहे, असे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले. वास्तविक त्या रुग्णाच्या हातात एक कागद होता आणि त्यावर 22 जुलै असा उल्लेख होता. त्याला रुग्णालयात अ‍ॅडमिट व्हायचे होते. मात्र, कोरोना विषाणू संक्रमणाच्या भीतीमुळे कोणीही त्याची मदत करत नव्हते. तसेच त्याकडे दुर्लंक्ष करत होते. काही कर्मचार्‍यांना मदतीसाठी विचारला असता त्यांनी हे आमचे काम नसल्याचे सांगितले.

संबंधित कर्मचारी आणि स्ट्रेचर उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित कर्मचारी आल्यानंतर या रुग्णाला घेऊन जातील, तोपर्यंत तो इथेच राहील, असे सांगत त्यांनी मला तिथून जायला सांगितले,’ असे म्हणत डॉ. मानसी पवार यांनी ससून रुग्णालय परिसरातील ही घटना सांगितली आहे. तसेच याला जबाबदार कोण? असाही प्रश्न मानसी पवार यांनी त्यांनी फेसबुकव्दारे उपस्थित केला आहे.

दरम्यान, याअगोदरही पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचा गलथानपणा चव्हाट्यावर आणण्यार्‍या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासन, प्रशासनाला जाग कधी येणार?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

ते आमचं काम नाही…म्हणणार्‍यांवर कारवाई होणार का?
ससून हॉस्पिटल हे शासकीय रुग्णालय असून या ठिकाणी अनेक रुग्ण सध्या उपचारासाठी येत आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लोकं शासन आणि सरकारने सांगल्याप्रमाणे आता सोशल डिस्टंन्स ठेऊन वावरत आहेत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, हे सोशल डिस्टंन्स ठेवताना मात्र, माणसातील माणूसकी हरवता कामा नये, हे देखील सरकार आणि शासनाने सांगणे आवश्यक आहे. पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात आजारी रुग्णाला कोणीही हात न लावता त्याकडे थेट दुर्लंक्ष केल्याचा प्रकार घडला आहे. परिसरात पडलेल्या रुग्णाला मदत करणे, हे आमचे काम नाही, असे म्हणून काम झटकणार्‍यांवर काय कारवाई होणार? तसेच ससून रुग्णालय आवारात असे प्रकार होत असतील तर त्याला जबाबदार कोण असणार? असा आता प्रश्न उपस्थित होत आहे. हा सर्व प्रकार डॉ. मानसी पवार या महिला डॉक्टरने फेसबुकव्दारे समोर आणला. यावर सोशल मिडियातून संताप व्यक्त केला जात असून ससून रुग्णालयाच्या प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.