Income Tax Department Alert | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केले अलर्ट, यांच्यापासून रहा सतर्क अन्यथा पैशांचे सुद्धा होऊ शकते नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Department Alert | सायबर क्राईम (Cybercrime) देशातील प्रत्येक क्षेत्रात पाय पसरत आहे. फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. याबाबत प्राप्तीकर विभागाने (IT Department) लोकांना सावध केले आहे. विभागाकडून माहिती देण्यात आली की, लोकांना अशा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात कधीही अडकू नये आणि अशी स्थिती समोर आल्यास त्यांची सत्यता आवश्य तपासून पहा. (Income Tax Department Alert)

प्राप्तीकर विभागाने नुकतेच ट्विट केले आहे की, लोकांनी नोकरीचे आमिष दाखवणार्‍यांपासून सावध रहावे. अलीकडे, अनेकांना प्राप्तीकर विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले आणि लोकांना बनावट जॉयनिंग लेटरही जारी केले गेले.

SSC च्या अधिकृत वेबसाइटवर तपासा अपडेट

विभागाने पुढे माहिती दिली की, विभागाच्या गट-ब आणि गट-क मधील पदे स्टाफ सिलेक्शन कमिटीने म्हणजे SSC द्वारे जारी केली आहेत. म्हणजेच, त्याबद्दल कोणताही मेसेज आल्यास, आपण SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते तपासावे. खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. (Income Tax Department Alert)

पैशाचे होऊ शकते नुकसान

विभागाने म्हटले आहे की, कोणतीही अज्ञात लिंक उघडू नका.
अशा मेसेजमुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.
या लिंकवर क्लिक करून तुम्हीही फसवणुकीत अडकू शकता.
यासोबतच नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारा तुमच्याशी संपर्कही करू शकतो. जो तुमच्याकडून नोकरी देण्यासाठी पैसे मागू शकतो, आणि पैसे घेतल्यानंतर तो फरार होऊ शकतो. या कारणास्तव कोणतेही अपडेट तुम्ही एसएससीच्या पोर्टलवर पाहू शकता.

Web Title :- Income Tax Department Alert | income tax department alerted be careful with them or else there may be loss of money

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP | भाजपला आर्थिक विषयात रस, निवडणूक निधी गोळा करण्याचा भाजपचा प्रयत्न, राष्ट्रवादीचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Pune Nashik Semi High Speed Railway | महारेलने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पातील स्थानकांसाठी इच्छुक कंपन्यांकडून मागवले EOI

BJP Rajesh Pandey | भाजप निवडणूक प्रमुखपदी राजेश पांडे यांची नियुक्ती

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समितीने अखेरच्या बैठकीत 2500 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना एकमताने दिली मान्यता; नदी सुधार, नदी काठ सुधार, पीपीपी तत्वावरील रस्त्यांच्या कामांचे कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर

Gold-Silver Rates Today | …म्हणून सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किंमतीत तब्बल 3 हजार रूपयांची घसरण