इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नवी सुविधा सुरू ! टोल फ्री नंबर 1800117574 वर करा ‘ब्लॅकमनी’ची तक्रार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत निवडणुकांदरम्यान काळ्या पैशाचा आणि रोख रकमेचा अवैध वापर रोखण्यासाठी आयकर विभागाने १८००११७५७४ एक नवीन टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. या नंबरवर कोणतीही संबंधित माहिती कोणीही देऊ शकते. दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता काळ्या पैशावर आणि प्रलोभनांवर नजर ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागाने २४X७ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

आयकर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, यासाठी लोकांना टोल फ्री क्रमांक १८००११७५७४ देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. येथे लोक कोणत्याही प्रकारच्या मनी फोर्स, बेकायदेशीर रोख वितरण आणि निवडणुकांशी संबंधित इतर प्रकारच्या गुन्ह्यांविषयी विभागाकडे तक्रार करू शकतात. आयकर विभागाचा हा नियंत्रण कक्ष तपास विभागात स्थापित करण्यात आला आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत ७० जागांवर विधानसभा निवडणुका होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येतील. निवडणूक आयोगाने प्राप्तिकर विभागाच्या २२ महसूल अधिकाऱ्यांची या निवडणुकांसाठी खर्च निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. ही लढत प्रामुख्याने आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस यांच्यात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/