त्वरा करा ! आत्तापर्यंत भरला नसेल इन्कम टॅक्स तर 31 ऑक्टोबर आहे अंतिम तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर त्वरित भरून घ्या अन्यथा मोठा दंड आकारला जाऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2019 आहे. ज्यांचे अकाउंट ऑडिट होणे बाकी आहे अशा नागरिकांसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) गेल्या महिन्यात आयटीआर आणि लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत वाढविली होती.

परतावा (रिटर्न) कोण भरू शकेल
आयकर कायद्याच्या कलम 44AB अंतर्गत मूल्यमापन केलेल्या कंपन्या, भागीदारी कंपन्या, मालकी हक्क यांचा समावेश असणाऱ्यांचेच फक्त आयटीआर भरले जातील.

वैयक्तिक करदात्यांसाठी अंतिम तारीख –
वैयक्तिक आयकर भरणा, नोकरी करणारे, हिंदु अविभाजित कुटुंब (एचयूएफ) आणि ज्यांना ऑडिटिंगची आवश्यकता नाही त्यांना 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सक्तीने परतावा भरावा लागला होता. परंतु ज्यांचे रिटर्न भरणे चुकले असेल ते दंड भरून आयटीआर दाखल करू शकतात .

आयटीआर दाखल न केल्यास दंड
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट 2019 नंतर 31 डिसेंबर 2019 पर्यंत आयटीआर भरल्यास 5000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच 1 जानेवारी 2020 ते 30 मार्च 2020 पर्यंत आयटीआर दाखल केल्यास तुम्हाला 10 हजार रुपये दंड आकारला जाईल.

visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like