Income Tax रिटर्न भरण्याचे टेन्शन संपले ! नवीन ई-पोर्टलवर मिळतील CA, जाणून घ्या कसा मिळेल लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यात येणार्‍या अडचणींमधून सुटका झाली आहे. जर तुम्हाला सुद्धा रिटर्न भरण्यात अडचणी येत असतील तर घाबरण्याची आवश्यकता नाही. यासाठी कुणी चार्टर्ड अकाऊंटंट (Chartered Accountants) शोधण्याची आवश्यकता नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तुमची ही अडचण सोडवली आहे.

टॅक्स पेयर्ससाठी ई-फायलिंग पोर्टल
इन्कम टॅक्स विभागाने नवीन ई-फायलिंग पोर्टल 7 जूनला लाँच केले होते. या पोर्टलवर तुम्ही ITR फायलिंग किंवा दुसर्‍या संबंधीत सेवांच्या मदतीसाठी टॅक्सपेयर्सला चार्डर्ट अकाऊंटंट (सीए), ई-रिटर्न इंटरमिजिएटरी (ERI) किंवा एखाद्या ऑथराईज्ड रिप्रेंझन्टेटिव्हला घेऊ शकता. यामुळे त्या टॅक्स पेयर्सला सुविधा मिळेल ज्यांना रिटर्न भरण्यात अडचण येते.

टॅक्सपेयर्सला मिळतील CA, ERI
E-filing portal वर तुम्ही सहजपणे My CA Service यूज करून आपल्यासाठी एखादा सीए घेऊ शकता. याशिवाय तुम्ही एखाद्या सीएला हटवू सुद्धा शकता किंवा अगोदरपासून असाईन एखाद्या सीएला पुन्हा घेऊ शकता. हे चार्टर्ड अकाऊंटंट ई-फायलिंग पोर्टलवर तुमची पूर्ण मदत करतील. यामुळे वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील.

ई-फायलिंग पोर्टलवर अशी घ्या सीएची मदत

ई-फायलिंग पोर्टलवर सीए सर्व्हिसेसचा फायदा घेण्यासाठी पुढील सोपी प्रक्रिया फॉलो करा…

1. सर्व प्रथम इन्कम टॅक्सचे ई-फायलिंग पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal/about-portal वर जा आणि लॉग-इन करा.

2. आता ऑथराईज्ड पार्टनर्समध्ये जाऊन My Chartered Accountants वर क्लिक करा.

3. आता Add CA वर क्लिक करा आणि मेंबरशिप नंबर, चार्टर्ड अकाऊंटंटचे नाव आणि व्हॅलिडेशन इत्यादी माहिती भरा.

4. आता सर्व डिटेल्स भरल्यानंतर ICAI डेटाबेसद्वारे व्हॅलिटेशनच्या नंतर तुम्ही असाईन सीएची मदत घेऊ शकता.

कसे मदत करतील सीए

1. जेव्हा तुमच्याकडून सीए येईल तेव्हा तो सर्व आवश्यक फॉर्म्स भरण्यास मदत करेल.

2. सीए, टॅक्सपेयर्सचे असाईन केलेले फॉर्म्स ई-व्हेरिफाय करेल.

3. याशिवाय सीए बल्क फॉर्म (Form 15CB) अपलोड करेल.

4. सोबतच तुमचे जेवढे फॉर्म भरले आहेत ते दाखवेल, जर काही अडचण किंवा तक्रार असेल तर ते एडिट सुद्धा करेल.

5. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे लॉग-इनला जास्त मजबूत बनवेल.

ERI ची मदत मिळेल
या पोर्टलवर तुम्ही e-Return Intermediary (ERI) ची सुद्धा मदत घेऊ शकता. CAs इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्सचे सदस्य असतात, तर e-Return Intermediary ऑथराईज्ड व्यक्ती असतात जे टॅक्सपेयर्सकडून त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासह इतरही अनेक कामे करतात.

Web Title :- income tax return filing become easy on new e portal get assistance from cas eris know the process

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य