विनयभंग प्रकरण : कोर्टानं DIG निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामिन फेटाळला, अडचणीत कमालीची वाढ

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – पॉक्सो केसप्रकरणात डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे येथील एमटी विभागातील डीआयजी पदावर मोरे कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर मोरे यांनी पनवेल येथील सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. आज झालेल्या सुनावणीत मोरे यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जामीन फेटाळल्यानंतर हायकोर्टात अपील करण्यासाठी कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. परिचित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरे यांच्यावर आरोप आहे. मोरे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार दाखल करुन घेतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी खारघरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले होते. तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेल्या, विकासक असेलेले पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी मोरे यांची आठ वर्षापूर्वी खारघरमध्ये ओळख झाली होती. मोरे यांनी त्यांच्याकडून दुकान गाळे विकत घतले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/