ND vs AUS Test | तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 9 गडी राखून विजय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Test) यांच्यात इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीतील तिसरा सामना नुकताच पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकत 9 विकेट्सनी भारताचा पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS Test) मालिकेतील आव्हान अजून टिकून आहे. या मालिकेत भारताने 2 तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिच फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असल्याने प्रथम फलंदाजी करणे भारताला महागात पडले आणि भारताचा पहिला डाव 33.2 षटकांत 109 धावांवर संपुष्टात आला. यानंतर प्रत्युत्तरसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघाने सर्वबाद 197 धावा केल्या. यानंतर भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात केली पण त्यामध्ये पण भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताने दुसऱ्या डावात 163 धावा केल्या यामध्ये एकट्या पुजाऱ्याच्या 59 धावा आहेत. (IND vs AUS Test)

यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांची गरज होती. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होताच पहिल्या षटकात भारताच्या आर अश्विनने उस्मान ख्वाजाला 0 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला.
मात्र त्यानंतर ट्रेव्हिस हेड (नाबाद 49) आणि लाबुशेन
(नाबाद 28) यांनी तुफान फटकेबाजी 76 धावाचं लक्ष्य पार करत
हा सामना 9 विकेट्सनी सहज जिंकला. या विजयासह या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.

 

Web Title :- IND vs AUS Test | australia won 3rd test match against india in indor ind vs aus test

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Recruitment 2023 | पोलिस भरतीवेळी उमेदवारांना त्रास, मृत्यूच्या दुर्घटना टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे 4 ते सकाळी 10 वेळेत घेण्याची मागणी

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ ! एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनप्रकरणी अजित पवार यांची सरकारवर टीका

Attack On Sandeep Deshpande | देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करा, मनसे नेत्याची पोलिसांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Aurangabad ACB Trap | पेन्शन मंजूर करुन आणण्यासाठी लाचेची मागणी, कृषी अधिकारी कार्यालयातील लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात