जेव्हा ‘शेर’ आपल्या मैदानात फलंदाजीसाठी उतरतो

रांची : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहज नमवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने ३१३ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. आजच्या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली.

सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा आणि अंबाती रायुडू हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतल्यानंतर, भारतीय संघ बॅकफूटवर गेला. त्यानंतर मैदानावर उतरला तो रांचीचा लोकल बॉय महेंद्र सिंग धोनी. त्याने मैदानावर पाऊल ठेवलं आणि मैदानात एकच गजर झाला. धोनी…धोनी…..

या क्षणाचा व्हीडिओ खुद्द बीसीसीआयने ट्वीटवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ शेअर करत त्यांनी याला मस्त असं कॅप्शन दिलं आहे. जेव्हा शेरत्याच्या गुहेत फलंदाजी करण्यास बाहेर पडतो, अस बीसीसीआयने म्हटलं आहे.