×
Homeक्रीडाIND vs BAN | बांगलादेशविरुद्धच्या सामन्याअगोदर रोहित शर्माचे संघासाठी सूचक वक्तव्य; म्हणाला...

IND vs BAN | बांगलादेशविरुद्धच्या सामन्याअगोदर रोहित शर्माचे संघासाठी सूचक वक्तव्य; म्हणाला त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी…

पोलीसनामा ऑनलाइन टीम : IND vs BAN | भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. त्यांच्यामध्ये उद्या पाहिला सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या अगोदर भारताचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. (IND vs BAN)

 

काय म्हणाला रोहित शर्मा?
“गेल्या 7-8 वर्षांपासून बांगलादेश एक आव्हानात्मक संघ आहे. आम्हाला त्यांच्याविरुद्ध सहज विजय मिळाला नाही आणि त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी चांगले क्रिकेट खेळावे लागेल. 2015 मध्ये आम्ही येथे एक मालिका गमावली होती. त्यामुळे या संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही. तसेच तो म्हणाला एक संघ म्हणून आम्हाला कुठे सुधारणा करायची आहे यावर आम्ही लक्ष ठेवू. एकाच वेळी इतक्या गोष्टींचा विचार न करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, जसे की आपल्याला हे किंवा ते संयोजन वापरायचे आहे, आपल्याला ही व्यक्ती किंवा ती व्यक्ती किंवा वर्ल्ड कपमध्ये खेळायचे आहे. मला आणि प्रशिक्षकाला आम्हाला काय करायचे आहे, याची कल्पना आहे. विश्वचषक जवळ आल्यावर आम्ही ते करू. आम्हाला फक्त विश्वचषकापर्यंत चांगले क्रिकेट खेळायचे आहे,” असे रोहित शर्मा यावेळी म्हणाला. (IND vs BAN)

मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर
मात्र या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या संपूर्ण वनडे मालिकेला मुकणार आहे. शमी या मालिकेतून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून उमरान मलिकचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

 

भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर,
राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, लोकेश राहुल, ऋषभ पंत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,
दीपक चहर, कुलदीप सेन, शाहबाज अहमद, उमरान मलिक. (IND vs BAN)

 

बांगलादेशचा एकदिवसीय संघ : लिटन दास (कर्णधार, यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन,
महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन, शकीब अल हसन, अनामुल हक (यष्टीरक्षक), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक),
नुरुल हसन, इबादत हुसेन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसम अहमद, तस्किन अहमद.

 

Web Title :- IND vs BAN | captain rohit sharma held a press conference before the first odi between india and bangladesh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल

Railway IRME Exam-UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोगावर मोठी जबाबदारी; आयोजित करणार रेल्वे भरतीच्या ‘या’ परीक्षा

Must Read
Related News