IND vs NED | त्यानं भारत-नेदरलँड मॅच सुरु असतानाच गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, तिनेही दिला होकार, पाहा VIDEO

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध नेदरलँड (IND vs NED) सामना सिडनी येथे नुकताच पार पडला. या सामन्यात भारताने नेदरलँडवर 56 धावांनी विजय मिळवत मैदान मारलेच पण सोबतच एका भारतीय चाहत्याने प्रेमाचे मैदानही मारले आहे. टीम इंडियाच्या (IND vs NED) एका फॅनने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आयसीसीने (ICC) स्वत: त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

विशेष म्हणजे तरुणाने तरुणीला प्रपोज केल्यावर तिने होकारही दिला. त्यामुळे आयसीसीने व्हिडीओ टाकताना त्याला ’ती हो म्हणाली’ असे कॅप्शनही दिले आहे. तसेच या व्हिडीओवर निर्णय बाकी आहे, असे मजेशीर कॅपशन दिले असून एखाद्या थर्ड अंपायर डिसीजनची वाट जशी क्रिकेटप्रेमी स्क्रिनवर पाहतात तशाच भावना हा व्हिडीओ पाहताना येत आहेत.

 

भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी केली.
एका मोठ्या धावसंख्येच्या फरकाने भारताने सामना जिंकला.
सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत 179 धावा नोंदवल्या. यामध्ये रोहित, विराटसह सूर्यकुमारने अर्धशतक झळकावले.

 

ज्यानंतर नेदरलँड संघाला 123 धावांत रोखले, ज्यामुळे 56 धावांनी सामना भारताने जिंकला आहे.
फलंदाजाच्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँडची धावसंख्या अधिक होऊ दिली नाही.
या विजयासह भारत ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.

 

Web Title :- IND vs NED | t20 world cup 2022 india fan proposes to his girlfriend ind vs ned t20 wc match video goes viral watch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Terence Lewis | मला मॅसेजद्वारे शिवीगाळ केली…, नोरा फतेहीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणात कोरियोग्राफरचा खुलासा

Aaditya Thackeray | गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत; शेतकर्‍यांच्या बांधावरुनच थेट आदित्य ठाकरेंनी सुनावले

Keshav Upadhye | ‘वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न!’ केशव उपाध्ये यांची टीका