IND Vs NZ | ‘या’ माजी क्रिकेटपटूनं सांगितली हिटमॅन रोहितच्या कॅप्टनसीमधील चूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्माने कालच्या सामन्यात (IND Vs NZ) विजय मिळवून आपल्या नव्या इनिंगची जोरदार सुरुवात केली आहे. या मॅचमध्ये (IND Vs NZ) रोहितनं 36 बॉलमध्ये 48 रनची खेळी करत विजयाचा पाया रचला. टीम इंडियाच्या टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून रोहितची ही पहिलीच मॅच होती. रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय क्रिकेटमधील एक अनुभवी आणि यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलमध्ये (IPL) सर्वात जास्त 5 वेळा स्पर्धा जिंकली आहे.

 

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी बुधवारच्या मॅचमध्ये रोहित शर्माकडून झालेली चूक सांगितली आहे. टीम इंडियानं जयपूरच्या मॅचमध्ये (IND Vs NZ) व्यंकेटेश अय्यरला (Venkatesh Iyer) पदार्पणाची संधी दिली. यावर्षीची आयपीएल स्पर्धा (IPL 2021) गाजवणाऱ्या अय्यरकडं हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. व्यंकेटेश अय्यर डाव्या हातानं बॅटींगसह मध्यमगती बॉलिंगही करू शकतो. पण, बुधवारच्या मॅचमध्ये अय्यरला बॉलिंग मिळाली नाही. रोहितनं फक्त 5 बॉलर्सचा वापर केला.

आकाश चोप्रानं त्याच्या युट्यूब चॅनलवर रोहित शर्माकडून झालेल्या चुकीबद्दल सांगितले आहे.
‘टीम इंडियाला एका फास्ट बॉलिंग ऑल राऊंडरची गरज आहे, असं सांगितलं जातं.
त्यामुळेच व्यंकटेश अय्यरची निवड झाली आहे. तरीही त्याला बॉलिंग करण्याची संधी मिळाली नाही.
माझ्या मते, ही रोहितच्या मोजक्या चुकांपैकी एक चूक आहे. सामान्यपणे त्याची कॅप्टनसी परफेक्ट असते,
पण ही एक छोटी चूक झाली, असं आकाश चोप्रा म्हणाले.
टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग घेतली असेल आणि समोरची टीम चाचपडत खेळत असेल तर
त्याला आरामात 1-2 ओव्हर्स बॉलिंग देता आली असती असेसुद्धा आकाश चोप्रा यांनी सांगितले.
तसेच भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोन्ही अनुभवी बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली.
विशेषत: भुवीनं नव्या आणि जुन्या बॉलसह चांगली कामगिरी केली ही आनंदाची गोष्ट असल्याचं आकाश चोप्रा यावेळी म्हणाले.

 

Web Title :- IND Vs NZ | ind vs nz team india captain rohit sharma should have bowled venkatesh iyer said aakash chopra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nawab Malik | ‘पहिल्या पत्नीच्या मामेभावाला वानखेडेंनी अडकवलं’; नवाब मलिकांचा खळबळजनक गौप्यस्फोट

PM Kisan | कोट्यावधी शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! आता ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही ‘पीएम किसान’चे पैसे, मोदी सरकारने बदलले नियम

Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ चांगल्या योजनांमध्ये गुंतवा पैसा, जाणून घ्या किती वेळात होतील दुप्पट