मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आजही मलिकांची आरोपाची धाड सुरूच आहे. ‘वानखेडे यांनी पहिल्या पत्नीच्या मामेभावाला खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकले. असा खळबळजनक दावा नवाब मलिकांनी केला आहे. त्यावेळी मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना लक्ष्य केलं आहे. ‘वानखेडे यांचा फर्जीवाडा हळूहळू समोर येत आहे. संपूर्ण सत्य समोर येईल तेव्हा समीर वानखेडे यांची नोकरी जाईल, असा दावा देखील त्यांनी केला आहे. तर, समीर वानखेडे हे पहिल्या पत्नीच्या कुटुंबालाही धमकावत असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना मलिक (Nawab Malik) म्हणाले, ‘वानखेडे यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
वाद निर्माण झाल्यानंतर पहिली पत्नी सत्य समोर आणेल, या भीतीपोटी वानखेडे यांनी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता.
त्यासाठी पहिल्या पत्नीच्या मामेभावाला अडकवण्यात आलं. एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्या मुलीच्या मामेभावाजवळ ड्रग पोहोचवण्यात आलं.
त्यानंतर राज्य सरकारच्या एजन्सीद्वारे त्याला अटक करण्याचं कटकारस्थान रचलं गेलं. आजही तो मुलगा तुरुंगात आहे.
‘माझ्याविरोधात तुम्ही काही बोललात तर संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकेन, अशा धमक्या त्यांनी पहिल्या पत्नीच्या कुटुंबाला दिल्या आहेत.
प्रचंड दहशत निर्माण केली आहे,’ असं मलिक यांनी म्हटलं आहे.
–
दरम्यान, एका क्षुल्लक वादातून वानखेडेंनी IPS अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या आरोपांखाली फसवण्याचं काम केलं.
त्याविरोधात पीडितांनी एनडीपीएस कोर्टात (NDPS Court) जामीन अर्ज दाखल केला आहे,
तसेच, ‘संबंधित आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी कुठलाही छापा पडला नव्हता.
वानखेडे आणि त्यांचे अधिकारी त्या इमारतीच्या आवारात फिरत होते.
मुलाला घरातून बोलावून घेतलं आणि बोगस केस करून ड्रग मिळाल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला.
त्या इमारतीतील सीसीटीव्ही तपासून पाहण्याची विनंती पीडित आयपीएस अधिकाऱ्यानं न्यायालयाकडं केली. असं मलिक म्हणाले.
Web Title :- Nawab Malik | ncp leader and minister nawab malik made fresh allegations against ncb officer sameer wankhede
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rashmi Shukla | IPS अधिकारी रश्मी शुक्ला कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर हजर राहणार?