Homeक्रीडाIND Vs NZ Test Series | कानपूर कसोटीवर वसीम जाफरचे 'ते' ट्विट...

IND Vs NZ Test Series | कानपूर कसोटीवर वसीम जाफरचे ‘ते’ ट्विट तुफान व्हायरल

जयपूर : वृत्तसंस्था –  आजपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ Test Series) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात (IND Vs NZ Test Series) भारतीय संघानं टॉस (Toss) जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कानपूरमध्ये (Kanpur) सामना सुरू झाल्यानंतर थोडा वेळ धुके होते. त्यावेळी समोरचे नीट स्पष्टसुद्धा दिसत नव्हते. यावरून भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरनं (Wasim Jaffer) यावरून मजेशीर ट्वीट केलं आहे.

वसीम जाफरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
तसंच त्याच्या वरच्या भागात कसोटी सामन्याचा एक फोटो शेअर केला आहे.
यासोबत त्यानं ‘धुवां धुवां था वह समां’ असे कॅप्शन दिले आहे.
या फोटोबरोबर त्याने फोटोच्या अर्ध्या भागात ‘हिंदुस्तान में क्या चल रहा है’ असं लिहिलेला मेसेज पोस्ट केला आहे.
यामध्ये पाकिस्तानचा सैनिक काय सुरू आहे असं विचारताना दिसतोय.
यावर भारताचा जवान ‘हिंदुस्तान में तो फॉग चल रहा है’ असं म्हणताना दिसत आहे.
जाफरच्या या ट्वीटवर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया आज कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( World Test Championships)
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला आव्हान देण्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यात विराट कोहली(Virat Kohli), रोहित शर्मा(Rohit Sharma),
रिषभ पंत (Rishabh Pant), मोहम्मद शमी (Mohammed Shami) आदी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
याआधीसुद्धा अजिंक्यच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुळ चारली आहे.
यावेळीसुद्धा टीम इंडियाकडून पुनरावृत्तीची अपेक्षा आहे.

 

Web Title : IND Vs NZ Test Series | hindustan mein toh fog chal raha hai wasim jaffer hilarious reaction smog first morning kanpur test

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

World Top Business Family | जाणून घ्या अमेरिकेच्या वॉल्टन कुटुंबाने कशी केली होती ‘गडगंज’ संपत्तीची ‘वाटणी’, तसंच करायचंय रिलायन्सचे मुकेश अंबानी यांना!

HBCSE Recruitment 2021 | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई इथे भरती; पगार 1,31,000 रुपयापर्यंत, जाणून घ्या

Holiday Calendar | 2022 मध्ये किती सुट्ट्या? शनिवार-रविवारमध्ये बुडणार 12 हॉलिडे 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News