Ind Vs Pak Asia Cup 2022 | पाकिस्तान विरूद्ध प्लेईंग-11 मध्ये बदल निश्चित, रवींद्र जडेजा बाहेर, आता कुणाला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ind Vs Pak Asia Cup 2022 | आशिया कप 2022 मध्ये सुपर-4 सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी अक्षर पटेलचा (Akshar Patel) समावेश करण्यात आला आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सामना होणार असताना भारताला हा धक्का बसला आहे. (Ind Vs Pak Asia Cup 2022)

 

बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी रवींद्र जडेजाबाबत एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. रवींद्र जडेजाने आशिया चषक स्पर्धेतील आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला प्लेईंग-11 मध्ये बदल करावा लागणार आहे. (Ind Vs Pak Asia Cup 2022)

 

आशिया कप 2022 मध्ये रवींद्र जडेजा

विरुद्ध पाकिस्तान – 35 धावा, 11/0
विरुद्ध हाँगकाँग – 15/1

 

रोहित शर्मा कोणाला संधी देणार ?

अष्टपैलू रवींद्र जडेजाची जागा घेणारा कोणताही खेळाडू हा केवळ अष्टपैलू असू शकतो. कारण जडेजा बाहेर गेल्याने बॅटिंगचा एक पर्याय कमी झाला आहे, त्याचप्रमाणे तो दोन-चार ओव्हर टाकू शकतो. अशावेळी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड (Rohit Sharma and Rahul Dravid) यांच्यासमोर हे सर्वात मोठे टेन्शन आहे.

त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळेल, जो काही षटके टाकू शकतो तसेच फलंदाजी करू शकतो ? अन्यथा अक्षर पटेलला प्लेइंग – 11 मध्ये थेट प्रवेश दिला जाऊ शकतो. कारण तो डाव्या हाताचा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज आहे, तसेच तो वेगवान फलंदाजीही करू शकतो. अक्षरला यूएईमध्ये आयपीएल (IPL) खेळण्याचाही अनुभव आहे.

 

ऋषभ पंतला संधी मिळेल का ?

हाँगकाँगविरुद्ध (Hong Kong), भारताने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) विश्रांती दिली आणि ऋषभ पंतला (Rishabh Pant) प्लेइंग-11 मध्ये प्रवेश दिला.
पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याचे पुनरागमन निश्चित आहे,
अशावेळी रवींद्र जडेजाच्या जागी ऋषभ पंतला घेणार का ? जेणेकरून फलंदाजीचा एक पर्याय वाढवता येईल,
अशावेळी सर्व 20 षटके तीन वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि एक अष्टपैलू गोलंदाजांनी टाकावी लागतील.

 

हे असू शकतात पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग – 11 :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक,
भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, आवेश खान.

 

Web Title : –  Ind Vs Pak Asia Cup 2022 | ravindra jadeja replacement against pakistan match team india playing 11 india vs pakistan asia cup 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा