इंदापूरात 11 वर्षाच्या चिमुरडीची ‘कोरोना’वर मात, फुलांच्या वर्षावाने स्वागत

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लाॅकडाऊनच्या काळात मुंबईहुन मौजे शिरसोडी (ता.इंदापूर) येथे आलेल्या चार सदस्सीय कुटुंबातील अकरा वर्षाच्या चिमुरडीसह तीची आई तपासणीत कोरोना पाॅझीटीव्ह आढल्याने त्यांना इंदापूर येथील कदम गुरूकुल मध्ये पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले होते.

उपचारादरम्यान 11 वर्षीय चिमुरडीसह तीच्या आईने कोरोनावर मात केल्याने दोघांनाही आज शुक्रवार सकाळी नऊ वाजता कदम गुरूकुल येथुन डीस्चार्ज देण्यात आला.यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी पूणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, सोनाली मेटकरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुरेखा पोळ, इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिक्षक एकनाथ चंदनशिवे यांनी कदम गुरूकुल येथे उपस्थीत राहुन चिमुरडीसह तीच्या आईचे पुष्प वर्षावाने स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

इंदापूरात 11 वर्षाच्या चिमुरडीची 'कोरोना'वर मात, फुलांच्या वर्षावाने स्वागत

इंदापूरात 11 वर्षाच्या चिमुरडीची 'कोरोना'वर मात, फुलांच्या वर्षावाने स्वागत

Geplaatst door Policenama op Vrijdag 29 mei 2020

गुरूवार दि. 14 मे 2020 रोजी मुंबईहुन पती-पत्नी व त्यांची दोन मुले शिरसोडी (ता.इंदापूर) या त्यांच्या मुळ गावी आले होते. त्याच दिवशी त्यांना गावातील शाळेत कोरोंटाइन करण्यात आले होते. तर सायंकाळी त्यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. तपासणीत सदर कुटुंबातील 11वर्षीय मुलगी व तीची 35 वर्षीय आई हे कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले होते. तर मुलीचे वडील व तीचा 7 वर्षीय लहाण भाऊ हे निगेटीव्ह आढळुन आल्याने या सर्वांना इंदापूर येथील कदम गुरूकुल मध्ये पुढील औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान कोरोनावर मात करून दोनही रूग्ण बरे झाल्याने त्यांना शुक्रवार दि.२९ मे रोजी सकाळी रूग्णांलयाच्या वतीने डीस्चार्ज देण्यात आला असुन पुढील सात दिवस त्यांना त्यांचे घरात होम कोरोंटाइन करण्यात येणार असल्याची माहीती इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.

कोरोना मुक्त चिमुरडी ही तीचे आई वडील व लहाण भावासह घरी जाण्यासाठी कदम गुरूकुलच्या दरवाजातुन बाहेर येताच उपस्थित सर्वांनी त्यांचे टाळ्यां वाजवुन, फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तहसीलदार सोनाली मेटकरी, डाॅ.एल.एस.कदम, यांचेसह उपस्थीत सर्वांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका वैद्यकीय अधीकारी डाॅ.सुरेखा पोळ, वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे, डाॅ. राजापुरे, डाॅ.शेळके, इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे वैद्यकीय पथक यांचेसह मोठ्या प्रमाणात स्थानीक उपस्थीत होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like