इंदापूर : विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या 5 जणांवर गुन्हा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – खासगी व्यवसाय करण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत यासाठी पत्नीचा वारंवार मानसिक व शारिरिक छळ करून तीला मारहान व दमदाटी करणारे फिर्यादीचे पती, सासु, सासरा, दीर, जाऊ यांचे विरोधात इंदापूर पोलीसात पिडीताने तक्रार केली असुन आरोपीविरोधात इंदापूर पोलीसानी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची फिर्याद सौ.स्नेहल अमोल पवार रा. वडारगल्ली, बाबाचौक, इंदापूर, जि.पूणे यांनी इंदापूर पोलीसात दीली आहे. दाखल तक्रारीत म्हटले आहे की फिर्यादीचे पती अमोल अशोक पवार, सुजाता अशोक पवार (सासु), अशोक यशवंत पवार (सासरा), सागर अशोक पवार (दीर), व निकीता संजय पवार (जाऊ) सर्व रा.कंबळमळा, तिरवंडी रोड, माळशिरस, जि. सोलापूर वरिल सर्वांनी मिळून गेल्या दीड वर्षापासुन मी माहेरून व्यवसायासाठी दोन लाख रूपये आणावेत यासाठी माझा शारिरिक व मानसिक छळ करीत आहेत. तसेच वारंवार जाच हाट करून जेवताना शिळे अन्न खायला देवून मारहाण व शिविगाळ दमदाटी करून येन केन कारणाने छळ व जाच हाट करत होते.

दिनांक १८ नोव्हेंबर रोजी वरील सर्वजणांनी फिर्यादीला शिविगाळ व मारहान व दमदाटी करून माहेरून दोन लाख रूपये घेवुन ये म्हणून घरातून हाकलून दीले आहे. त्यामुळे मी माहेरी येवुन माझे पती यांचेसह वरील सर्वाविरोधात पैशासाठी छळवणूक केल्याची फिर्याद दाखल करत असल्याचे फिर्यादीत म्हटले असुन सदर तक्रारीच्या अणूषंगाने इंदापूर पोलीसांनी वरील सर्व आरोपीविरोधात कलम 498 (अ) प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो.ह. लोंढे हे करत आहेत.

Visit : Policenama.com