Coronavirus : इंदापूर तालुक्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 59 नवे पॉझिटिव्ह

इंदापूर : प्रतिनिधी(सुधाकर बोराटे) –   इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटर अंतर्गत शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठीकाणी घेण्यात आलेल्या तीन ठीकाणच्या 159 टेस्टमध्ये 59 रूग्ण पाॅझीटीव्ह आले आहेत. तालुक्यातील एकुण 108 जणांची कोरोना रॅपिड आटिंजन टेस्ट घेण्यात आली.त्यामध्ये एकुण 45 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.तर 63 जण निगेटीव्ह आले आहेत. बारामती येथील खासगी प्रयोग शाळेत इंदापुर तालुक्यातील 26 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली, त्यापैकी 13 पाॅझीटीव्ह असुन 13 जण निगेटीव्ह आले आहेत. तर दिनांक 4 सप्टेंबर रोजी पूणे येथील प्रयोग शाळेत 25 स्वॅब पाठवीण्यात आले होते.त्यांचाही रिपोर्ट प्राप्त झाला असुन त्यामध्ये 1 पाॅझीटीव्ह व 24 निगेटीव्ह आले आहेत.तर दिनांक 5 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठीकाणी घेण्यात आलेल्या तीन ठीकाणच्या एकुण 159 टेस्टमध्ये 59 पाॅझीटीव्ह आले आहेत तर संपूर्ण तालुक्यात एकुण 1085 पाॅझीटीव्ह रूग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी 42 जणांचा मृत्यु झाला असल्याची माहीती तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक सुहास शेळके यांनी दीली आहे.

इंदापूर तालुक्यात 5 सप्टेंबर रोजी रॅपिड आटिंजन टेस्टमध्ये 45 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये इंदापूर तापी येथील 27 वर्षीय युवक, 32 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय युवक,29 वर्षीय युवक,55 वर्षीय पुरूष, शेळगाव येथील 40 वर्षीय पुरूष, 32 महिला,निमगाव केतकी येथील 33 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय पुरूष, बेलवाडी येथील 30 वर्षीय पुरूष,70 वर्षीय जेष्ठ नागरिक, 42 वर्षीय पुरूष, हगारेवाडी येथील 55 वर्षीय महिला, जक्शंन येथील 48 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय महिला, 33 वर्षीय महिला, 23 वर्षीय युवक, 30 वर्षीय पुरूष, इंदापूर अंबिंकानगर 65 महिला, 38 वर्षीय पूरूष, 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा, 11 वर्षीय चिमुकला,13 वर्षीय मुलगी, 10 वर्षीय चिमुकली, 5 वर्षीय चिमुकला, इंदापूर येथील 48 महिला, 54 पुरूष, 52 वर्षीय महिला व इंदापूर जामदार गल्ली येथील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

तर अगोती येथील 80 वर्षीय जेष्ठ नागरिक महिला, 20 वर्षीय युवक, 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष,अंथुर्णे येथील 28 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय पुरूष, 47 वर्षीय महिला, 8 वर्षीय चिमुकला,लाखेवाडी येथील 30 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय पूरूष, रूई बाबीर येथील 26 वर्षीय महिला, निरवांगी येथील 45 वर्षीय पुरूष 40 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिलेचा समावेश असुन पूणे येथील प्रयोग शाळेती 25 पैकी जंक्शन येथील 65 वर्षीय जेष्ठ नागरीकाचा समावेश आहे. तर बारामती येथील खासगी प्रयोग शाळेतील 26 पैकी 13 पाॅझीटीव्ह असुन त्यामध्ये उदमाईवाडी येथील 74 वर्षीय जेष्ठ नागरीक, बेलवाडी येथील 68 वर्षीय जेष्ठ नागरीक, निमगाव केतकी येथील 38 वर्षीय महीला, 34 वर्षीय पुरूष, 43 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय जेष्ठ नागरिक, 60 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा, 16 वर्षीय मुलगा, 13 वर्षीय मुलगी, 33 वर्षीय महिला व इंदापूर येथील 34 वर्षीय पुरूषाचा समावेश असल्याची माहीती सुत्रांनी दीली आहे.