इंदापूर : नराधम बापाने 5 महीण्याच्या मुलाला फेकले विहीरीत

इंदापूर  : पोलीसनामा ऑनलाइन  – इंदापूर तालुक्यातील मौजे वरकुटे येथे पत्नीच्या चॅरित्र्याच्या संशयावरून पाच महीण्यापूर्वी जन्मलेले मुल हे माझे नाही म्हणत निर्दयी पित्याने बाळाला पाण्याने भरलेल्या विहीरीत फेकुन दील्याने पाच महिण्याच्या बाळाचा दूर्दैवी मृृृत्यु झाल्याची घटना घडली असुन याबाबत मयत बाळाचे मामा दिपक मच्छींद्र तांबवे.(वय 20) रा.अण्णाभाऊ साठे नगर मोहोळ,जि.सोलापूर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दीली आहे. असुन पोलीसांनी नराधम पीत्यास बेड्या ठोकल्या असुन इंदापूर येथील न्यायालयात हजर केले असता आरोपीला सात दीवसाची पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दीले असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे दीपक मच्छिंद्र शिंदे. रा.वरकुटे, ता. इंदापूर,जि.पूणे यांचेशी फीर्यादी यांची बहीन पुजा हीचे लग्न झाले असुन ती तीचे पतीसोबत सासरी वरकुटे येथे राहण्यास होती. लग्नानंतर पुजा हीला दीवस गेल्याने तीला मुलगा झाला होता. त्याचे नाव ध्रुव असे ठेवले होते. पुजाची धाकटी जाऊ पिवु बाबु शिंदे हीने पूर्वी घरात जावा जावात झालेल्या भांडनाचा राग मनात धरून पुजाच्या पतीला पुजा हीचे दुसर्‍या मुलाशी संबध असल्याने हे मुल तुझे नसल्याचे सांगुन पती-पत्नीमध्ये वाद निर्माण केला होता.

याच कारनावरून पुजाचा पती पुजावर चॅरीत्र्याचा संशय घेवुन पती-पत्नीमध्ये वाद होऊन पाच महीण्यापूर्वी जन्मलेले बाळ हे माझे नसल्याने मी त्याला मारून टाकणार काय व्हायचे ते होवु दे असे म्हणून धमकावत होता. तर पुजाची सासु कांताबाई दत्तु शिंदे हीने पुजाला डीलीवरीसाठी माहेरी सोडताना पुजाला झालेले बाळ हे त्याच्या बापासारखे दीसेल त्यावेळेस पुजाला सासरी नांदायला घेवुन जाइन अन्यथा माहेरीच ठेवणार असल्याचे सांगीतले होते.

शुक्रवार दिनांक 31जुलै 2020 रोजी सकाळी 6:30 वा.चे सुमारास पुजा हीने तीच्या सासरी असताना पाच महीण्याच्या बाळाला दुध पाजुन राहत्या घरातील झोळीत झोपवीले व ती दुध आणण्यासाठी शेजारील वस्तीवर गेली असता तीचे पती दिपक मच्छींद्र शिंदे यांनी या संधीचा फायदा घेवुन तीच्या पाच महीण्याच्या ध्रुव या बाळाला शेजारील पाण्याने भरलेल्या विहीरीत फेकुन दीले.पुजा 7 वा.चे.सुमारास बाहेरून दुध घेवुन घरी आली असता तीला झोळीत बाळ दीसले नाही.त्यावेळी पुजाने तीचा पती व आजसासु यांना बाळाबद्दल विचारले असता तीचा पती मनोज यांनी तो विहीरीवर पाणी भरायला गेला असेल बग असे म्हणून निर्दयीपनाने झोपुन गेला.

त्यानंतर ध्रुवचा शोध आजुबाजुला घेत असताना तो सापडला नाही.त्यावेळी राजु हणुमंत शिंदे.रा.वरकुटे,ठवरे वस्ती याने बाळ शेजारील विहीरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे घरी येवुन सांगीतले.त्यानंतरसदर वीहीरीत पाहीले असता बाळ पाण्यात तरंगत असल्याचे दीसुन आले.त्यानंतर बाळाला पाण्यातुन बाहेर काढुन उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णांलयात दाखल केले असता बाळ मयत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगीतले.ही घटना फिर्यादीची बहीन पुजा हीने फीर्यादी यांना फोनवरून सांगीतली.फीर्यादीचे बहीनीची मानसिक स्थीती व्यवस्थीत नसल्याने इंदापूर पोलीस ठाण्यात या घटनेची फीर्याद पुजा हीचा भाऊ दीपक मच्छींद्र तांबवे.रा.मोहळ याने दीली आहे.

पोलीसांनी पुजाचा नराधम पती मनोज दत्तु शिंदे,सासु कांताबाई दत्तु शिंदे व जाऊ पीवु बबन शिंदे यांचेविरूद्ध घुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी नराधम पीत्यास बेड्या ठोकल्या असुन इंदापूर येथील न्यायालयात हजर केले असता आरोपीला सात दीवसाची पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दीले असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बीराप्पा लातुरे हे करत आहेत.