Pune News : सोलापूरच्या युवकाचा निर्घृण खून, भीमा नदी पात्रात आढळले मृतदेहाचे तुकडे

पुणे/इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  येथील गणेशवाडी-बावडा गावच्या हद्दीत भीमा नदीच्या गारअकोले पुलाजवळील नदीपात्रात संजय महादेव गोरवे (वय २३ रा. टाकळी, ता.माढा जि.सोलापूर) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. त्या युवकाचे धारदार हत्याराने हात, पाय, डोके तोडून त्याचे धड नदीपात्रात टाकण्यात आले. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समजते.

अधिक माहिती अशी की, मृत संजय गोरवे यांचे नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी दादा कांबळे (रा. बावडा), विकी उर्फ व्यंकटेश भोसले, महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे, हे (रा.टाकळी ता. माढा) आणि एका अल्पवयीन आरोपी होता. त्यामुळे संजयचा खून करण्यात आला आहे. दि. 17 जानेवारी रोजी सर्व आरोपींनी संगणमत करून संजयला, दादा कांबळे यांच्या घरी जेवण्यास बोलावले, त्यानंतर गणेशवाडी- बावडा गावच्या हद्दीत भीमा नदी किनारी मोटारसायकलने येऊन ते आरोपी तेथे होते. संजय तेथे येताच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचे हात-पाय व धड वेगळे करण्यात आले.

या प्रकरणावरून मृत युवकाची आई मंजुषा महादेव गोरवे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक केली आहे. तर त्यामधील एकजण विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन आरोपी आहे. पोलीस निरीक्षक सारंगकर, सहायक पोलीस निरीक्षक अजित जाधव, दाजी देठे व पोलीस सहकार्याने भीमा नदी पात्रातजवळ जाऊन संजय गोरवे यांचा मृत ताब्यात घेता असून, याचा पुढील तपास सुरू आहे.