इंदापूर : नाराज माळी गटाची दोन पदावर राष्ट्रवादीकडून बोळवण

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन

सुधाकर बोराटे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पूणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची नवीन जंबो कार्यकारीणी निवड नुकतीच इंदापूर येथिल पक्ष कार्यालयात जाहीर केली. या निवडीमध्ये इंदापुर तालुक्यातील नाराज राष्ट्रवादी माळी समाज गटाला बिन कामाच्या व नुसत्या नामधारी दोन पदावर बोळवण करून माळी समाजाचा रूसवा फुगवा काढण्याचा केवीलवाणा प्रयत्न पुणे जिल्हा राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे माळी समाजातील राष्ट्रवादी नाराज गट आणखीनच नाराज झाला आहे. थातुर मातुर नामधारी पदांची माळी समाजातील एक दोन जणांना लालच दाखवली. केवळ मतदानापुरताच माळी समाजाचा वापर वर्षानूवर्षे करून घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणार्‍या लोकसभा व विधानसभा नावडणूकीत माळी समाज जागा दाखवुन देण्यासाठी तयारीला लागला असल्याच्या चर्चेला संपूर्ण इंदापूर तालुक्यात उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यासाठी ३० नामधारी जिल्हा उपाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. तर जिल्हा सरचीटणीस पदावर तब्बल ४६ जणांची निवड करून नामधारी पदांची नुसती खैरात वाटली आहे. आगामी विधानसभा व लोकसभा तोंडावर आल्याने राष्ट्रवादीकडून पक्ष बांधणीचे काम सुरू आसुन त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीकडून तब्बल ३० जिल्हा उपाध्यक्ष व ४६ सरचिटनिसांच्या निवडी करून पक्ष बांधणी कामास सुरूवात करण्यात आली आहे. असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका जुन्या व जबाबदार राष्ट्रवादीच्या पदाधीकार्‍यांने पोलीसनामाच्या प्रतीनिधीशी बोलताना सांगीतले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’50d8fae0-cd38-11e8-9665-c71a7d30630c’]
राष्ट्रवादी इंदापुर तालुकाध्यक्ष पदासाठी माळी समाज राष्ट्रवादी गटातील अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. परंतु तालुकाध्यक्षपदाची मुदत आणखी एक वर्ष शिल्लक असताना राष्ट्रवादी पक्षाने तालुकाध्यक्षपदी पुन्हा महारूद्र पाटील यांचीच निवड केली. घाई गडबडीत ही निवड करून माळी समाज नाराज गटाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे. त्यामुळे नाराज झालेला माळी समाज गट सध्या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर दिनांक १३ आॅक्टोंबर रोजी इंदापूर येथे नाराज गटाची भाजपाचे पांडूरंग शिंदे यांचेशी चर्चेची बैठक ठरली आसुन पांडूरंग शिंदे यांचेशी चर्चा झाल्यानंतर माळी समाज नाराज गट पुढील निर्णय घेणार असल्याची विश्वावासनिय सुत्राकडून समजतेय.

इंदापुर तालुक्यात माळी समाजाची लोकसंख्या तीन नंबरवर आसुन, ५७ हजारापेक्षा जास्त मतदान माळी समाजाचे आहे. नाराज माळी समाज गटाने विधानसभा व लोकसभेला राष्ट्रवादीला सोडचीठ्ठी देवून वेगळा विचार केल्यास राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. याचा थेट परिणाम विधानसभा व लोकसभा निवडणुकीवर होणार असल्याने राष्ट्रवादीला ते कदापी परवडणारे नाही. परिणामी माळी समाजाला वार्‍यावर सोडणे हे राष्ट्रवादीला परवडणारे नाही. त्यामुळे माळी समाजाची होणारी राजकीय ससे होलपट थांबवुन माळी समाजाला योग्य न्याय द्यायचा असेल तर माळी समाजाला राष्ट्रवादीने विश्वासात घेवून चांगल्या जबाबदार्‍या द्याव्या लागतील. तरच माळी समाज राष्ट्रवादीच्या संगतीत राहील अन्यथा वेगळी वाट धरणार हे मात्र नक्की आहे.
[amazon_link asins=’B07C8KJBRY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’576c5442-cd38-11e8-97c8-27d5f6f0d4d1′]
राष्ट्रवादीकडून नाराज माळीसमाजाची चेष्टाच : भाजप नेते पांडूरंग शिंदे

इंदापुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने माळी समाजाचा वापर नुसता मतासाठी व पक्षाच्या फायद्यासाठीच आजपर्यंत करून घेतला आहे. राष्ट्रवादीचे तालुक्यातील वरीष्ठ नेते फक्त बोलघेवडे आसुन माळी समाजाचा नुसता वापर करूण घेणे एवढाच यांचा राजकीय धंदा असल्याने माळी समाजाला दोन नामधारी दिलेली पदे ही केवळ आणि केवळ माळी समाजाची राष्ट्रवादीकडून होत असलेली चेष्टाच असल्याचे मत पांडूरंग ( तात्या ) शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.

Loading...
You might also like