Coronavirus : इंदापूरमध्ये ‘कोरोना’चा पहिला रूग्ण आढळला

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, आतापर्यंत एकही रूग्ण इंदापूरमध्ये आढळला नव्हता. दरम्यान, 78 वर्षीय नागरिकाची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे इंदापूरामध्ये कोरोनानं शिरकाव केला असं म्हणाव लागेल.

24 मार्च ते 6 मे या लाॅकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या व वर्दळ असलेल्या तालुक्यातील मुख्य इंदापूर शहरात आजपर्यंत एकही रूग्ण कोरोना बाधीत सापडला नाही. त्या अगोदर इंदापूर तालुक्यातील भिगवण, शिरसोडी व पोंदकुलवाडी या ठीकाणी एकूण पाच रूग्ण पाॅझीटीव्ह सापडले होते. ते सर्व बाहेरून आलेले होते.परंतु इंदापूर शहरात अद्याप एकही कोरोना बाधीत रूग्ण सापडला नव्हता.

तीन महीने सोलापूर येथे वास्तव्यास असलेले 78 वर्षीय जेष्ठ नागरिक हे मुळचे इंदापूरचे रहिवासी आहेत. ते सोलापूरहुन नुकतेच इंदापूर मुक्कामी आले होते.त्यांना हृदयाचा त्रास होऊ लागल्याने पुन्हा पुणे येथील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची कोरोना तपासणी केली असता ते कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाल्याने इंदापूर शहरात पहीला कोरोना बाधीत रूग्ण आढळुन आला आहे.

तर त्यांचे संपर्कात आलेल्या 19 जणांना इंदापूरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील आय सोलोशन कक्षात दाखल करून त्याचें घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पूणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहीती तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दीली.