नुकसानग्रस्त शेतकऱ्याना शासनाने तात्काळ मदत करावी : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –   इंदापूर तालुक्यात चालु आठवड्यात सोमवार व शुक्रवारी रात्री जोरदार ढग फुटीसह अतिवृष्टी झाल्याने शेती पिके, फळबागा व पोल्ट्री फार्म व्यावसायीकांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच आनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांची हानी होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.तर शेतातील उभी पिके पाण्यात वाहुन गेल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाला आलेला घास परतीच्या पावसाने हिरावुन घेतल्याने शेतकर्‍यांवर अगोदर कोरोना महामारीचे संकट आता आसमानी संकट यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी पुरता खचुन गेला असुन नूकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे, घराचे व इतर पंचनामे करून शेतकर्‍यांना नूकसान भरपाई तात्काळ मीळण्याची व्यवस्था मागणी करणारे निवेदन भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे पाठविले आहे.

इंदापूर तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी सुमारे ५२५ मि.मी.एवढी असुन आज अखेर तालुक्यात जवळपास दुप्पट म्हणजे सुमारे ९५० ते ०१ हजार मि.मी. पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. इंदापूर तालुक्यात चालु आठवड्यात सोमवारी

एका दिवसात ६५ मि.मी. पेंक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी समजली जाते. त्यामुळे प्रशासनाने ऊस, मका, बाजरी, चारा-पिके आणि डाळिंब, मोसंबी, पेरू, द्राक्ष आदी फळबागांचे पंचनामे तातडीने करावेत. तसेच बावडा परिसरात अनेक घरात पाणी शिरल्याने बाधित कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तसेच काही ठिकाणी पोल्ट्री फार्म मध्ये पावसाचे पाणी घुसल्याने पक्षी मृत्युमुखी पडून नुकसान झाले आहे.

झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकरी वर्गाला व नागरीकांना आर्थिक मदत करून दिलासा घ्यावा,अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी निवेदनात केली आहे. सदर निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, कृषी विभाग मंत्रालय मुंबई, कृषी आयुक्तालय पुणे, जिल्हाधिकारी पुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे, तहसीलदार इंदापूर, तालुका कृषी अधिकारी आदींना पाठविण्यात आल्याची माहीती हर्षवर्धन पाटील यांनी दीली.