देशाच्या सर्वात मोठ्या बँकेनं चीनकडून आयात कमी करण्यासाठी सांगितली ‘ही’ पध्दत !, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारत आणि चीनमध्ये सीमा वादाच्या दरम्यान देशाची सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) चीनकडून इम्पोर्ट कमी करण्याची पद्धत सांगितली आहे. एसबीआयचे म्हणणे आहे की, चीनकडून इम्पोर्ट कमी करण्यासाठी भारताला खुप विचारपूर्वक पुढे जावे लागेल. एसबीआयने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चीनने भारतात महाग आणि स्वस्त अशा दोन्ही प्रकारचे मार्केट तयार केले आहे. रिपोर्टनुसार, 59 चीनी अ‍ॅप बॅन करण्याच्या सरकारच्या निर्णयाने स्थानिक आयटी सेक्टरला आपल्या क्षमता विकसित करण्याची संधी मिळाली.

एसबीआयने आपला रिसर्च रिपोर्ट ईकोरॅपमध्ये म्हटले आहे की, चीनने भारतात महाग आणि स्वस्त अशा दोन्ही प्रकारच्या इम्पोर्टवर हळुहळु आपली पकड मजबूत केली आहे. यासाठी आपल्याला चीनवरील इम्पोर्ट अवलंबत्व कमी करण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतील आणि आपण अचानक इम्पोर्ट बंद करू शकत नाही. चीनने भारतात सर्व कॅटेगरीच्या इम्पोर्टमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. तो भारताला स्वस्त वस्तूंपासून महागडे कॅपिटल आणि इलेक्ट्रिकल वस्तूपर्यंत निर्यात करत आहे.

चीनशी अशी होईल स्पर्धा
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सर्व्हिसेस आणि मर्केंडाइज ट्रेड एक्सपोर्टच्या आकड्यांवरून समजते की, भारत सर्व्हिसेसच्या आघाडीवर चीनशी स्पर्धा करू शकतो. टेलिकम्युनिकेशन्स, कम्प्यूटर आणि इनफॉर्मेशन सर्व्हिसेसमध्ये भारताचा एक्सपोर्ट चीनपेक्षा कितीतरी जास्त आहे. मात्र, चीन यामधील आपला वेग वाढवत आहे आणि म्हणून भारतालाही आता आपला वेग वाढवण्याची गरज आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सीमेवरील वादानंतर आता चीनकडून आयातीवर प्रतिबंध लावण्याबाबत व्यापक वातावरण तयार झाले आहे. भारताला काही अशा उत्पादनांच्या आयातीवर निश्चितपणे प्रतिबंध आणला पाहिजे, ज्यामध्ये भारताकडे चीनच्या तुलनेत चांगली स्थिती आहे आणि स्थानिक लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) मदत करू शकेल. भारत अनेक उत्पादनांसाठी चीनवर अवलंबून आहे.

उदाहरणार्थ 1996-97 मध्ये 22 अशा श्रेणी होत्या, ज्यांच्यामध्ये भारताने चीनकडून काहीही आयात केले नव्हते. परंतु, 2019-20 मध्ये त्यांचे आयात मुल्य जवळपास 50 कोटी डॉलरवर पोहचले. सुरक्षेच्या कारणांमुळे सरकारद्वारे चीनच्या 59 अ‍ॅपवर प्रतिबंधाबाबत रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, यामुळे स्थानिक तंत्रज्ञान कंपन्यांना अ‍ॅप विकसित करण्याची संधी मिळाली आहे.