मोदी-जिनपिंग यांच्यात आत्तापर्यंत 18 बैठका, लडाखच्या संघर्षाने सर्व प्रयत्न अयशस्वी !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांच्या चकमकीत 20 भारतीय सैनिक शाहिद झाले. वृत्तसंस्था एएनआय च्या मते, चिनी सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरसह 43 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2014 पासून आतापर्यंत दोन्ही देशांच्या उच्च कमांडच्या बैठका, वाटाघाटी, करारांना गलवान खोऱ्यातील घटनेने एकाच झटक्यात संपविले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या 6 वर्षात 18 वेळा भेट घेतली.

या द्विपक्षीय बैठकींशिवाय असेही काही प्रसंग आहेत जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदेत मोदी-जिनपिंग यांची औपचारिक भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 9 वेळा चीनला भेट दिली आहे. यात 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री असताना. तर 5 वेळा पंतप्रधान म्हणून मोदी चीनला गेले आहेत. गेल्या 6 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 18 वेळा भेट घेतली. या दरम्यान, वन- टू- वन बैठक वगळता अन्य देशांमधील दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र बैठकींचा देखील समावेश आहे.

15 जुलै, 2014: पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची ब्राझीलमध्ये प्रथम भेट झाली. यात सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सहमती दर्शविली होती. या प्रसंगी मोदी म्हणाले होते की, दोन्ही देशांमधील एक मैत्रीपूर्ण वातावरण जगासमोर उभे राहील. यावेळी चीनने संबंधांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला होता.

सप्टेंबर 2014 : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर चार महिन्यांनी सप्टेंबरमध्ये पहिला द्विपक्षीय भारत दौरा केला होता. पंतप्रधानांनी त्यांना आपल्या गृह राज्य गुजरातचे दर्शन घडविले. अहमदाबादमध्ये पीएम मोदी आणि जिनपिंग साबरमती नदीच्या काठावर झोक्यावर बसलेले दिसले. हा दोन्ही देशांसाठी एक अविस्मरणीय क्षण होता. यावेळी दोन्ही देशांमध्ये 12 करार झाले. चीनने भारतात 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते.

मे 2015 : पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये प्रथमच दोन दिवसांचा चीन दौरा केला. पीएम मोदी यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील व्यापाराशी संबंधित 26 करार झाले. यावेळी पीएम मोदी यांनी बीजिंगमध्ये प्रांतातील नेत्यांच्या फोरमच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले.

जुलै 2015: पंतप्रधान मोदी जुलै 2015 मध्ये तीन दिवसांच्या दौरयावर रशियाला पोहोचले. ब्रिक्स आणि शांघाई शिखर परिषदेत भाग घेताना पीए मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट झाली.

सप्टेंबर 2016 : चीनच्या हांगझाऊ येथे जी -20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीत भारताने पीओके-प्रेरित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि सामरिक हितसंबंधांसाठी संवेदनशील राहण्याची गरज असल्याचे सांगितले. जिनपिंग यांनी वादग्रस्त विषयांना संवादातून सोडविण्याचा आग्रह धरला.

जून 2017: शांघाय सहकार संघटनेत भारताचे सदस्य बनताना पंतप्रधान मोदी आणि चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. यावेळी पंतप्रधानांनी एससीओमधील भारताच्या पूर्ण सदस्याबद्दल चीनचे आभार मानले.

जुलै 2017: नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची हॅम्बर्ग येथे जी -20 शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट झाली. या परिषदेत पंतप्रधान मोदींनी डोकलामचा मुद्दा उपस्थित केला.

सप्टेंबर 2017: चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेदरम्यान भेट घेतली आणि चर्चा केली.

एप्रिल 2018: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चीनमधील वुहान येथे शिखर परिषदेदरम्यान भेट झाली. या दरम्यान, जागतिक महत्त्व असलेल्या मुद्द्यांवरील मतांच्या देवाणघेवाणीसाठी प्राधान्यक्रमांवर सविस्तर चर्चा आयोजित केली गेली. जिनपिंग पंतप्रधान मोदींना हुबे येथील संग्रहालयात घेऊन गेले जेथे चिनी कलाकारांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

9 जून, 2018: पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी गेले. या दरम्यान त्यांनी आणि राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांच्या बैठकीत ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्याशी आणि तांदळाच्या निर्यातीशी करार झाले.

नोव्हेंबर 2018: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी अध्यक्ष शी जिनपिंग देखील अर्जेटिना मधील ब्युनोस आयर्स येथे जी -20 शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी दाखल झाले. 30 नोव्हेंबर 2018 रोजी मोदी आणि जिनपिंग यांच्यात बैठक आणि चर्चा झाली.

मे 2019: एका परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. या बैठकीत पीएम मोदी यांनी शी जिनपिंग यांच्याशी दहशतवादाकडे पाकिस्तानच्या दृष्टिकोनाविषयी चर्चा केली होती.

जून 2019: नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर किर्गिस्तानमधील बिश्केक येथे चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी दुसरी बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना ऑक्टोबरमध्ये भारतात येण्याचे आमंत्रण दिले आणि या भेटीचा अजेंडा निश्चित करण्यात आला.

ऑक्टोबर 2019: पीएम मोदी आणि शी जिनपिंग यांची महाबलीपुरममध्ये अनौपचारिक बैठक झाली. 2019 मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची ही तिसरी भेट होती. बंगालच्या उपसागरावर किना-यावर जिनपिंग यांच्याशी 6 तासांची बैठक झाली. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर चर्चा झाली.

नोव्हेंबर 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षाच्या शेवटी ब्राझील दौर्‍यावर गेले. ते ब्राझीलमधील 11 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी गेले होते. या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती यांचीही भेट झाली आहे.