भारताच्या विरूद्ध 2 फ्रंटवर आघाड्या उघडतोय PAK, दशहतवाद्यांच्या संपर्कात चीनी सेना

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) वर भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाचा फायदा पाकिस्तान उचलण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी लष्कराने नॉर्थ लडाखमध्ये आपले सैन्य वाढवले आहे. यासोबतच चीनी लष्कर हे दहशतवादी संघटना अल बद्रशी चर्चा करत आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने आपल्या सैनिकांच्या दोन डिव्हिजन गिलगिट-बालटिस्तान परिसरात तैनात केल्या आहेत. पाकिस्तानने सुमारे 20 हजार अतिरिक्त सैनिकांना नॉर्थ लडाखमध्ये तैनात केले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तान दोन फ्रंट वॉरची संधी पहात आहे.

तर, चीनी आर्मीने जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी दहशतवादी संघटना अल बद्रशी चर्चा केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय चीनसोबत मिळून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवणे आणि बॅट ऑपरेशन घडवण्यासाठी प्लॅन बनवत आहे. सूत्रांची म्हणणे आहे की, काश्मीरमध्ये असलेल्या 100 दहशतवाद्यांची यासाठी मदत घेतली जाऊ शकते.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांचे दहशतवाद्यांविरूद्ध ऑपरेशन जारी आहे. मागील काही काळात 120 पेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. यापैकी बहुतांश स्थानिक होते. ठार केलेल्या दहशतवाद्यांमध्ये काही परदेशी सुद्धा होते. सुरक्षा दलांच्या ऑपरेशनमुळे पाकिस्तान भितीच्या छायेत आहे अणि नवीन मार्ग शोधत आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की, दोन फ्रंट वॉरच्या स्थितीत पाकिस्तानने काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा प्लॅन बनवण्यात आला आहे. या इनपुटनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे आणि जरूरी पावले उचलली जात आहेत.