‘ड्रॅगन’ची दादागिरी रोखण्यासाठी भारतानं बनवलं ‘चक्रव्यूह’, चीनला ‘इथं’ दिसणार ‘इम्पॅक्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे लडाखमधील लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) तणाव आहे, तर दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रातही चीन दादागिरी करत आहे. चीनच्या अशा दुष्कृत्याला भारताने प्रत्युत्तर देणे सुरू केले आहे. आता संपूर्ण जगाला चीनचा मुत्सद्दीपणा आणि फसवणुकीचा खेळ समजला आहे.

चीनवर निशाणा साधत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, ‘एकीकडे जगातील सर्वात लोकप्रिय आणि लोकशाही देश भारताला आपण पाहतो, तर दुसरीकडे चीन दक्षिण चीन समुद्रावर सैनिकीकरण करते आणि त्या प्रदेशांवर बेकायदेशीरपणे आपला हक्क सांगत आहे. यामुळे महत्वाच्या सागरी क्षेत्राला धोका आहे आणि त्यांनी पुन्हा एक वचन तोडले आहे.’

ज्या दक्षिण चीन समुद्रात चीन आपली दादागिरी दाखवत आहे, आता त्याला तिथेच घेरण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपानच्या चौक्यांनी समुद्री चक्रव्यूह तयार केले आहे.

रणनीतीकदृष्ट्या दक्षिण चीन समुद्र भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा भारताच्या व्यापारासाठी पारंपारिक मार्ग आहे. दुसरीकडे चीनच्या विस्तारवादी धोरणांमुळे त्याचे शेजारील देशही खूप त्रस्त आहेत.

चीन एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन तयार करणार आहे, ज्यात ते तैवान आणि व्हिएतनामच्या नियंत्रणाखाली असलेल्या बेटांना जबरदस्तीने सामील करणार आहेत. चीन या झोनमध्ये प्रतास, पार्सेल आणि स्पार्टले बेटांना देखील समाविष्ट करणार आहे. या बेटांवरून त्यांचे तैवान, व्हिएतनाम आणि मलेशियासह वाद चालू आहेत. चीनमुळे त्रस्त असलेल्या या देशांची मैत्री भारताशी वाढली असून त्यामुळे चीनची डोकेदुखी वाढली आहे.

एवढेच नव्हे तर जगातील अनेक देशांची यादी पाहिल्यास बरेच देश भारताच्या बाजूने उभे असलेले दिसतील. १९९८ साली झालेल्या भारताच्या आण्विक स्फोटावेळी फ्रान्सने भारताला पाठिंबा दिला होता. १९७१ आणि कारगिल युद्धात इज्राईल भारतासोबत होता. १९६२ च्या चिनी युद्धाच्या वेळी ऑस्ट्रेलियाने भारताला पाठिंबा दिला होता. युरोपमधील जर्मनीपासून ब्रिटन हे भारतासोबत आहेत.

अमेरिका प्रत्येक टप्प्यावर भारताला पाठिंबा देण्याविषयी बोलतो आणि रशियाशी मैत्रीची नवीन चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह स्वतः तेथे गेले आहेत. दुसरीकडे चीन बरोबर दोनच देश दिसत आहेत- एक पाकिस्तान आणि दुसरा उत्तर कोरिया आणि या दोघांची कोणतीही आंतरराष्ट्रीय ओळख आणि अस्तित्व नाही.