Coronavirus in India : कोरोनाने मोडले सर्व विक्रम ! देशात एका दिवसात 4 लाख नवीन केस, 24 तासात 3523 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोनाच्या त्सुनामीचे भितीदायक दृश्य समोर आले आहे. कोरोनाचा आकडा आता 4 लाखांच्या पुढे पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी ताज्या आकड्यांनुसार, मागील 24 तासात 401,993 नव्या कोरोना केस आल्या आणि 3523 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर 2,99,988 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी देशात 386,452 नवी केस आल्या होत्या. जगभरातील सुमारे 40 टक्के केस दररोज भारतात नोंदल्या जात आहेत. यावरून कोरोनाच्या भीषण स्थितीचा अंदाज येतो.

दिल्लीत 375 हजार कोरोना रूग्णांचा मृत्यू
दिल्लीत मागील 24 तासात कोरोना संसर्गाची 27,047 नवीन प्रकरणे आली. यासोबतच दिल्लीत 375 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याच 24 तासात 25,288 कोरोना रूग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनामुळे 16147 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत एकुण 11 लाख 49 हजार 333 लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत. दिल्लीत एका दिवसात 20 एप्रिलला सर्वात जास्त 28,395 लोक संक्रमित झाले होते. तर गुरुवारी एका दिवसात सर्वात जास्त 395 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रात 62,919 नवीन प्रकरणे
महाराष्ट्रात शुक्रवारी कोविडची 62,919 नवी प्रकरणे समोर आली आणि 828 लोकांचा संसर्गाने मृत्यू झाला. संसर्गाची नवी प्रकरणे गुरुवारच्या तुलनेत कमी होती, परंतु मृतांची संख्या वाढली आहे. राज्यात गुरुवारी संसर्गाची जिथे 66,159 प्रकरणे आली होती तिथे मृतांची संख्या 771 होती. यासोबतच शुक्रवारी एकुण संक्रमितांची संख्या 46 लाख 2 हजार 472 झाली, तर मृतांची एकुण संख्या 68,813 होती.

कोरोना स्थितीचे महत्वाचे अपडेट
* 30 एप्रिलपर्यंत देशभरात 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 कोरोना डोस दिले आहेत.
* देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.10 टक्के तर रिकव्हरी रेट 82 टक्के आहे. अ‍ॅक्टिव्ह केस वाढून 17 टक्केपेक्षा जास्त झाल्या.
* कोरोना अ‍ॅक्टिव्ह केसच्या बाबातीत भारत जगात दुसर्‍या नंबरवर.
* एकुण संक्रमितांच्या संख्येत भारत जगात दुसर्‍या स्थानावर.
* जगात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत.