… म्हणून आयफोनच्या किंमती कमी होण्याची दाट शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात तयार होत असलेले आयफोन पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतात. यामुळे आयफोन स्वस्त होऊ शकतात. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही परवानग्या घेणे बाकी आहे पण आयफोन XR आणि आयफोन XS लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. फॉक्सकॉन कंपनी ऍपलसाठी या आयफोनची निर्मिती भारतात करत आहे. भारतामध्ये आयफोन XR च्या सुरवातीची किंमत जवळपास ५६,००० रुपये आणि XS आयफोनची किंमत १ लाख रुपये आहे.

भारतामध्ये आयफोन आयात केले जातात. या आयफोनवर २०% आयातशुल्क लागते. परंतु आता स्थानिक मैन्युफैक्चरिंगमुळे हा कर वाचेल. यामुळे किंमती कमी होतील. त्याचबरोबर ऍपल लोकल सोर्सिंगचे नियम देखील पूर्ण करेल.

जगातील स्मार्टफोनची दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ भारतात आहे. भारतात ऍपल स्मार्टफोनला खूप पसंती मिळते. किंमती अधिक असल्यामुळे भारतात ऍपलचे मार्केट शेअर १ % आहे. ऍपल कंपनी स्वस्त मॉडेल SE, 6S आणि आयफोनची असेम्बलिंग (जोडणी) भारतामध्ये करत आहे. विस्ट्रॉन कॉर्प कंपनीच्या बंगळुरू युनिटमध्ये असेम्बलिंग केली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या