भारतीय पुरूष टेबल टेनिस संघास कांस्य पदक

जकार्ता :

इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज दहाव्या दिवशी भारतीय टेबल टेनिस पुरूष संघाने टेबल टेनिसमधील पहिले पदक मिळवून दिले.टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला दक्षिण कोरियाकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. टेबल टेनिस मध्ये भारताला किमान रौप्य पदकाची अपेक्षा होती.

[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b91cc880-aad4-11e8-86b3-59dc244edf80′]

भारताचे जी. सत्ययन, अचंता थरथ कमाल आणि ए. अमलराज यांना उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
जागतिक क्रमवारीत ३९ व्या क्रमांकावर असलेल्या सथ्यनने सामन्याची सुरुवात चांगली केली होती. मात्र पहिला सेट ११-९ ने जिंकल्यानंतर पुढचे तिन्ही सेट सत्यनने गमावले. अमलराजने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही पराभवाचा सामना करावा लागला. अखेर उपांत्य फेरीत झालेल्या पराभवामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.