पाकिस्तान आडकित्यात …! आता चीनमधून पाकला जाणारी उड्डाणे रद्द 

बिजिंग : वृत्तसंस्थापाकिस्तानला बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे. पाकिस्तानला केवळ भारताकडूनच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील फटका बसला आहे. चीनमधून पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चीनचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे ,असे मानले जात आहे. चीनचे हे मोठे पाऊल म्हणजे पाकिस्तानसाठी मोठी नामुष्की मनाली जात आहे. एकीकडून भारताचा दबाव तर दुसरीकडून इतर देशाकडून देखील पाकिस्तानवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे पाकिस्तान आडकित्यात सापडला आहे.

पाकची चहुबाजूने कोंडी – पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा धक्का बसला. कारण, जैश ए मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या या संघटनेसह पाकिस्तानच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये ४५ जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली. त्याकरता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारतानं मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली होती. या हल्ल्यानंतर अमेरिकेनं देखील भारतासोबत असल्याचं सांगितलं होतं. शिवाय , पाकिस्तानला देखील दहशतवादाच्या मुद्यावरून खडसावलं होतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चीननं देखील भारताला या मागणीला पाठिंबा दिला होता.

You might also like