खुशखबर ! आता ‘पोस्ट ऑफिस’मधून मिळणार ‘कर्ज’, जाणून घ्या ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस कायमच आपल्या ग्राहकांसाठी नव नव्या योजना आणत आहेत, आता पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला बँकिंग सुविधा देखील मिळणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सुरु केल्यानंतर पोस्ट ऑफिसने ऑनलाइन बँकिंग सुविधा देण्यास सुरुवात केली. आता पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना सेविंग अकाऊंट आणि फिस्क्ड डिपॉजिटची देखील बँकिंग सुविधा देते, याशिवाय विविध सुविधा देखील देते. आता तर तुम्ही आवश्यकता असल्यास पोस्ट ऑफिसमधून कर्ज देखील घेऊ शकतात.

मिळणार छोटे कर्ज
सरकारने डाक विभागाला स्मॉल फायनान्स बँक म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे ग्राहकांना छोटे लोन मिळू शकेल. पोस्ट ऑफिस पेमेंट बँक आता बचत खाते, चालू खाते सुरु करु शकेल. याशिवाय ग्रुप टर्म इंश्योरन्स, बिल पेमेंट व रिचार्ज, रेमिटेंसेज अॅण्ड फंड ट्रान्सफर, डोरस्टेप बँकिंग, DoP प्रॉडक्ट पेमेंट आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची सुविधा देण्यात येणार आहे.

पोस्ट ऑफिस पेमेंट बँक
IPPB खात्याला पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याबरोबर जोडले जाऊ शकते. याशिवाय पेमेंट्स बँकमध्ये नेट बँकिग, मोबाइल बँकिंग, SMS बँकिंग, मिस्ड कॉल बँकिंग, फोन बँकिंग आणि QR कार्ड द्वारे बँकिंगची सुविधा मिळेल.

परंतू पेमेंट बँक पोस्ट ऑफिस लोन देऊ शकत नाही परंतू हेच पोस्ट ऑफिसमध्ये सुरु केलेल्या आरडी अकाऊंच्या रक्कमेमधून लोन देऊ शकतील. याशिवाय IPPB सुकन्या समृद्धी अकाऊंट, PPF आणि आरडी अकाऊंटच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट किंवा ट्रान्सफरची सुविधा देखील देते. या सर्व सुविधा DoP प्रॉडक्ट पेमेंटच्या अंतर्गत मिळेल.

देशातील स्मॉल फायनान्स बँक
देशात स्मॉल फायनान्स बँक बचत खाते, चालू खाते, FD, RD, लोन, म्युचूअल फंड, इंशोरन्स, रेमिटेंस सारख्या सेवा देतील. सध्या देशात १० स्मॉल फायनान्स बँका कार्यरत आहेत.

१. Au स्मॉल फायनान्स बँक
२. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक
३. फिनकेयर स्मॉल फायनान्स बँक
४. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
५. ESAF स्मॉल फायनान्स बँक
६. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
७. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
८. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
९. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक
१०. जना स्मॉल फायनान्स बँक

आरोग्यविषयक वृत्त –