बंगालच्या उपसागरात भारताच्या सर्वात प्राणघातक ‘क्षेपणास्त्राची’ यशस्वी चाचणी, काही क्षणातच होईल शत्रूचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी बंगालच्या खाडीत भारताने सर्वात धोकादायक ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली. अशी माहिती मिळत आहे की हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आयएनएस रणविजय वरून प्रक्षेपित करण्यात आले आहे. यापूर्वी घेण्यात आलेल्या तीन क्षेपणास्त्र चाचण्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या होत्या.

स्पुतनिक वेबसाइटच्या वृत्तानुसार, हे क्षेपणास्त्र नौदलाचे जहाज आयएनएस रणविजय वरून डागण्यात आले आणि अंदमान-निकोबार बेटाच्या एका निर्जन बेटाला टारगेट करून नष्ट केले गेले. चीनशी 8-9 महिन्यांच्या सीमा विवाद आणि संघर्षादरम्यान गेल्या काही दिवसांत भारताने अनेक क्षेपणास्त्रे, टॉरपीडो, क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेची यशस्वी चाचणी केली आहे. आजच्या चाचणीचा उद्देश क्षेपणास्त्राची रेंज वाढविणे हा होता. या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची रेंज वाढवून 400 किमीपर्यंत करण्यात आली आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र 28 फूट लांब आहे. त्याचे वजन 3000 किलोग्रॅम आहे. हे 200 किलोग्रॅमचे पारंपारिक आणि परमाणू शस्त्रे घेऊन जाऊ शकते. हे 300 किमी ते 800 किमी पर्यंत बसलेल्या शत्रूवर अचूकपणे निशाणा लावू शकते. त्याचा वेग त्यास सर्वात घातक बनवतो. ते ताशी 4300 किमी वेगाने हल्ला करू शकते. म्हणजेच प्रति सेकंद 1.20 किलोमीटर. याचा मारा केल्यानंतर शत्रूला बचाव करण्याची किंवा हल्ला करण्याची कोणतीही संधी मिळत नाही.

अलीकडेच एक बातमी आली होती की व्हिएतनामला भारताचे सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा आहे. आतापर्यंत रशियाची संमती ही अडथळा ठरत होती, कारण रशिया आणि भारत यांनी एकत्रितपणे हे क्षेपणास्त्र बनवले आहे. पण आता हे क्षेपणास्त्र निर्यात करण्यास रशियाने परवानगी दिली आहे. आता भारताचे हे भव्य क्षेपणास्त्र व्हिएतनाममध्ये तैनात केले जाऊ शकते. यामुळे चीनला दक्षिण चीन समुद्रात सावधगिरी बाळगावी लागेल.

ब्रह्मोसच्या निर्यातीला परवानगी अशा वेळी मिळाली आहे जेव्हा चीनचा शेजारी देश व्हिएतनामने हे क्षेपणास्त्र भारतातून खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. व्हिएतनामला ब्रह्मोस आणि आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे भारताकडून घ्यायची आहेत. जर डील झाली तर व्हिएतनाम आपल्या देशाच्या रक्षणासाठी ही दोन्ही क्षेपणास्त्र तैनात करेल. यामुळे चीनची भीती दक्षिण चीन समुद्र आणि त्याच्या जवळपासच्या परिसरात कमी होईल. तसेच व्हिएतनामशी भारताचे संबंध आणखी मजबूत होतील.

जर ही डील झाली तर पुढील पाच वर्षांत भारताला 5 अब्ज डॉलर्सची निर्यात करावी लागेल. ब्रह्मोसच्या एका अधिकाऱ्याने मॉस्कोमध्ये सांगितले होते की, परवानगी देण्याच्या निर्णयामुळे भारत-रशिया सामरिक संबंध आणि संरक्षण सहकार्य नव्या उंचीवर जाईल. सन 2018 मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनीही म्हटले होते की जगातील अनेक देश भारतीय क्षेपणास्त्र खरेदी करण्यास इच्छुक आहेत. अनेक देशांनी भारतीय क्षेपणास्त्रांमध्ये रस दाखविला आहे. यापैकी व्हिएतनामला भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा आहे.

चीनमुळे अडचणीत आलेल्या किनारपट्टीय देशांनी जवळपास एक दशकापूर्वीच भारताकडे आग्रह केला होता की त्यांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र देण्यात यावे. तथापि चीनने भारताचे शेजारी देश पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार इत्यादी देशांना अनेक प्रकारची संवेदनशील शस्त्रे निर्यात करून भारताच्या सुरक्षेवर अडथळा निर्माण केला आहे, परंतु आता असे होणार नाही.