भारताकडून K-4 बॉलिस्टिक मिसाईलच परीक्षण, शत्रूला क्षणार्धात करेल ‘उद्धवस्त’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने रविवारी सायंकाळी आंध्रप्रदेशच्या तीरावर K-4 बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले. ही अशी मिसाईल आहे जी शत्रूचा सर्वनाश करू शकते. काही मिनिटांमध्ये पाकिस्तान आणि चीनमधील शहरांना भस्म करणाऱ्या या शक्तिशाली ताकदीचे नाव K-4 असे आहे. ही जहाजावरील मिसाईल आहे. म्हणजेच समुद्राच्या तळामधील पाणबुडी देखील ही मिसाईल सोडू शकते.

के – 4 क्षेपणास्त्र पहिल्या स्वदेशी आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत वरून सोडण्यात आले. के – 4 हे हे नाव भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, येथे के म्हणजे कलाम असा अर्थ देण्यात आला आहे. याबाबतची गोपनीयता बाळगायची होती म्हणून अशा प्रकारचे नाव देण्यात आल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, विशाखापट्टणम पासून 45 नॉटिकल मैलांच्या अज्ञात स्थानावरून के – 4 ची चाचणी घेण्यात आली. जिथून के – 4 लाँच केले गेले ती भारताची पहिली अरिहंत पाणबुडी स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे.

काय आहेत या मिसाईची वैशिष्ट्ये –
– K-4 ही वेगवान आणि सहज रडारमध्ये न येणारी मिसाईल आहे.
– याचे महत्वाचे सिस्टम बूस्ट गाइड फ्लाइट सिस्टम हे आहे.
– अग्नि-3 पेक्षाही आकाराने लहान असलेली ही मिसाईल आहे.
– शत्रूवर झिरो एरर ने हल्ला करू शकते.
– 2014 मध्ये पाणबुडीच्या सहाय्याने टेस्ट फायर केले गेले होते.

फेसबुक पेज लाईक करा –