COVID-19 : देशात 1 सप्टेंबरपर्यंत 35 लाख रूग्ण, अहवालानं वाढवली चिंता

बंगळुरू : वृत्तसंस्था – देशात कोरोनामुळे संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात नऊ लाखापेक्षा अधिक रुग्ण कोरोना बाधित आहेत. सध्याच्या राष्ट्रीय ट्रेंडकडे पाहता भारतीय विज्ञान संस्था म्हणजेच आयआयएससीने चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केला आहे. भारतामध्ये 1 सप्टेंबरपर्यंत 35 लाखांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर एकट्या कर्नाटकात हा आकडा 2.1 लाख एवढा असेल. तर देशात 10 लाख आणि कर्नाटकात 71 हजार 300 अ‍ॅक्टिव्ह केसेस असतील असा अंदाज आयआयएससीने व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारी नुसार देशात आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी रुग्णसंख्या समोर आली आहे. गेल्या 24 तासात 32 हजार 695 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 606 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राची चिंता वाढवणारा अंदाज
देशात रुग्ण संख्या वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबरच्या आठवड्यात 4.78 लाख अ‍ॅक्टिव्ह केसेसे असणं अपेक्षीत आहे. तर मार्च 2021 अखेरपर्यंत 37.4 लाख रुग्णांपैकी 1.4 लाख अ‍ॅक्टिव्ह केसेस असतील आणि 1.88 लाख मृत्यू झालेले असतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात 6.3 लाख एकूण केसेस होतील आणि 2.1 लाख अ‍ॅक्टिव्ह केसेस असतील असे आहवालात नमूद करण्यात आले आहे. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये अ‍ॅक्टिव्ह केसेस 81 हाजर आणि एकूण केसेस 2.4 लाख असतील. तामिळनाडूत 1.6 लाख आणि 53 हजार अ‍ॅक्टिव्ह केसेस असतील तर गुजरातमध्ये 1 सप्टेंबर पर्यंत 1.8 लाख एकूण कोरोना बाधित रुग्ण असतील तर यापैकी 61 हजार रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असतील असा अंदाज आहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

प्राध्यापक शशीकुमार जी. दीपक एस आणि त्यांच्या टीमने हा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार देशात 1 सप्टेंबर पर्यंत 1.4 लाख केसेस असतील. यापैकी 25 हजार मृत्यू फक्त महाराष्ट्रातून, दिल्लीत 9700, कर्नाटक 8500, तामिळनाडूत 6300 आणि गुजरातमध्ये 7300 मृत्यू असतील असे आहवालात नमूद करण्यात आले आहे.

सध्याची राष्ट्रीय आकडेवारी पाहता विविध राज्यांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही सध्याची परिस्थिती असून राज्य आणि केंद्राकडून सातत्याने नियमात बदल होत आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्याविषीचा अंदाज आम्ही वर्तवलेला नाही, असं शशी आणि दीपक यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते या प्रकारची आकडेवारी पुढील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे धोरणात आवश्यक ते बदल करता येतील. संसर्घाची तीव्रता, संसर्गाा कालावधी, वयोगट अशा विविध बाबींचा या अंदाजात समावेश आहे. दरम्यान, सध्याच्या ट्रेंडनुसार ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशात 9.7 लाख अ‍ॅक्टिव्ह केसेस असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.