ICC World Cup 2019 : IND Vs BAN सामन्यापुर्वीच ‘नागीण’ डान्स, ‘बिन’सह इतर ‘मीम्स’ सोशलवर ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर आज भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळणार असून बांगलादेशचा हा सामना करो या मरो असाच आहे, त्यामुळे या सामन्यात भारतीय संघावर वरचढ ठरण्यासाठी बांगलादेशचा संघ प्रयत्न करताना दिसणार आहे.

भारतीय संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न करणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या टाचेला दुखापत झाल्यामुळं त्याला विश्रांती दिली. मात्र काल त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याने आता भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

IND Vs BAN: मैच से पहले मीम्स का मजा, देखें फैन्स की क्रिएटिविटी

मात्र सामना सुरु होण्याआधीच भारतीय पाठीराखे आणि बांगलादेशचे फॅन्स यांच्यात सोशल मीडियावर युद्ध रंगले आहे. दरवेळी दोन्ही संघाच्या पाठिराख्यांत युद्ध रंगलेले पाहायला मिळत असते. दोन्ही बाजुंनी आपलाच संघ जिंकण्याचे दावे करण्यात येत आहे. यासंदर्भातले काही मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळून येत आहेत.

IND Vs BAN: मैच से पहले मीम्स का मजा, देखें फैन्स की क्रिएटिविटी

काही चाहत्यांनी एक फोटो शेयर केला आहे. यामध्ये अनुपम खेर पुंगी वाजवताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा संघ नागीण डान्स करताना दिसून येत आहे. या फोटोत पुंगी वाजवणाऱ्याच्या जागी भारतीय संघ आणि नागीण डान्सची तुलना बांग्लादेशच्या संघाशी केलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर नुकत्याच येऊन गेलेल्या अव्हेंजर्स एन्ड गेम मधील एक डायलॉग सध्या यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.

IND Vs BAN: मैच से पहले मीम्स का मजा, देखें फैन्स की क्रिएटिविटी

‘हम लड़ेंगे आखिरी सांस तक’हा डायलॉग मोठ्या प्रमाणात मीम्ससाठी वापरण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मिम्समध्ये या सिनेमातील कलाकारांच्या जागी बांगलादेशी खेळाडूंचे चेहरे लावण्यात आले असून हा डायलॉग लिहिण्यात आला आहे.

IND Vs BAN: मैच से पहले मीम्स का मजा, देखें फैन्स की क्रिएटिविटी

दरम्यान, २०१६ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमधील झालेल्या सामन्यातील रन आऊटचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात वापरून चाहते तसेच पाठीराखे एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसून येत आहे.

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्र्ष्टाचार ,सभापतींचे चौकशीचे आदेश

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे