ICC World Cup 2019 : ‘बाऊंड्री’ लाइन जवळ असल्याने इंग्लंडचा ‘विजय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील काल झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताला पराभूत करत सेमीफायनलमधील आपल्या प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. काल झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा भारताचा ३१ धावांनी पराभव केला. त्यानंतर सेमीफायनलची रेस आणखीनच टक्करची झाली असून सर्वच संघाची नजर उर्वरित सामन्यांकडे लागली आहे. सलग पाच सामन्यांत विजय मिळवल्यानंतर अखेर इंग्लंडने भारताच्या विजयरथाला ब्रेक लावला. त्यामुळे कालच्या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलमधील आपला प्रवेश निश्चित करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न होता, मात्र कालच्या पराभवाने तो लांबला आहे. त्यामुळे आता भारताला उद्या होणाऱ्या बांग्लादेशच्या सामन्यात विजय मिळवून ते स्थान पक्के करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली याने भारतीय संघाच्या पराभवाची कारणे सांगितली. तसेच कोणत्या क्षणी भारतीय संघ खचला याचे देखील त्याने स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलताना तो म्हणाला कि, बाऊंड्री लाइनजवळ असल्यानेच इंग्लंड जिंकला. त्यामुळे त्याने दिलेल्या या कारणाने भारतीय संघाचे अपयश आणि फलंदाजीमध्ये केलेला निष्काळजीपणा नक्कीच झाकण्यासारखा नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंची पिसे काढताना २० षटकांत जवळपास १६० धावा उकलल्या. त्यामुळे या संपूर्ण सामन्यात इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला संपूर्ण सामन्यात बॅकफूटवर ढकलले. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने एकूण १३ षटकार लगावले. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी रिव्हर्स स्वीप मारून भारतीय गोलंदाजांना हैराण केले.

या सामन्याविषयी अधिक बोलताना विराट कोहली म्हणाला कि, या सामन्यात नाणेफेकीचा कौल फार महत्वाचा होता. खेळपट्टी सपाट असल्याने गोलंदाजाने कुठल्याही प्रकारची मदत नव्हती. एका बाजूला बाऊंड्री लाइन ५९ मीटरवर होती, तर दुसरीकडे ८२ मीटर होती. त्यामुळे फलंदाज रिव्हर्स स्वीप मारून धावा वसूल करत होते. या फटक्यांपुढे भारतीय फिरकीपटू निष्प्रभ ठरल्याचे देखील त्याने यावेळी सांगितले.
दरम्यान, भारतीय संघाचे या स्पर्धेत दोन सामने बाकी असून श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे.

आरोग्यविषयक बातम्या

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे